घरमुंबईआता डबेवाले देणार 'पेपर्स अॅण्ड पार्सल' सुविधा

आता डबेवाले देणार ‘पेपर्स अॅण्ड पार्सल’ सुविधा

Subscribe

घरातून डबे घेतल्यानंतर या अॅपवर यावर ज्या ठिकाणी डबेवाले जाणार तेथील कुरीअर पार्सल्स देण्यात येतील. डबे पोहोचवल्यानंतर फावल्या वेळेत ही सेवा डबेवाले देतील

मुंबईकरांचे पोट भागवण्यासाठी त्यांना वेळेवर डबा पोहोचवणारे डबेवाले आता हायटेक होणार आहेत. अँड्राईड फोनच्या या आधुनिक काळात मुंबईकरांचे पोट भरल्यानंतर मिळालेल्या फावल्या वेळेत कुरीअर सेवा देण्याचे काम करणार आहेत. त्यासाठी एक नव कोर अॅप तयार करण्यात आले आहे. ‘पेपर्स अॅण्ड पार्सल’ (paper and parcels) असे या अॅपचे नाव आहे.

mumbai dabbewala new app
आता देणार ‘पेपर्स अॅण्ड पार्सल’ सुविधा

१३ वर्षीय तिलकची आयडिया

१२६ वर्षे मुंबईकरांच्या सेवेत हजर असणाऱ्या डबेवाल्यांना हायटेक विचार करायला लावणारा अवघ्या १३ वर्षांचा आहे. तिलक असे या लहानग्याचे नाव असून डबेवाल्यांसाठी अॅप तयार करण्याची कल्पना त्याला सुचली. कारण डबा पोहोचवल्यानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळात डबेवाले कुरीअर सेवा देखील देऊ शकतात. त्यामुळे डब्याप्रमाणे कुरीअरच अगदी झटपट काम होऊन जाईल,असे त्याला वाटले आणि त्याने ही कल्पाना सुचवली आणि हे अॅप तयार करण्यात आले.

- Advertisement -
Tilak_concept_for_ad
१३ वर्षाच्या तिलकला सुचली नव्या अॅपची संकल्पना

कसं काम करेल हे अॅप?

घरातून डबे घेतल्यानंतर या अॅपवर यावर ज्या ठिकाणी डबेवाले जाणार तेथील कुरीअर पार्सल्स देण्यात येतील. डबे पोहोचवल्यानंतर फावल्या वेळेत ही सेवा डबेवाले देतील. अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली. सगळ्यात वेगवान सुविधा डबेवाले देत असतात. आता डिजिटल मार्गान सक्रीय होत कुरीअर सेवेचे काम केले जाणार आहे.

 अधिक उत्पन्नाची संधी

डबेवाल्यांना या कुरीअर सेवेतून अधिक उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आधुनिक युगात डबेवाल्यांचे बदलले रुप आपल्याला पाहायला मिळणार आहे, पण असे असले तरी अनेक डबेवाला संघटनांनी याला विरोध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -