घरताज्या घडामोडीपुनर्रोपित झाडे मृत पावल्यास तिप्पट झाडे लावण्याची अट

पुनर्रोपित झाडे मृत पावल्यास तिप्पट झाडे लावण्याची अट

Subscribe

पुनर्रोपित झाडांची काळजी घेण्यासाठी दहा वर्षे बंधनकारक करावी अशी मागणी ठरावाच्या सुचनेद्वारे काँग्रेस नगरसेविकेने केली.

मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामांमध्ये आड येणारी झाडे कापण्यास तसेच पुनर्रोपित करण्यास वृक्षप्राधिकरणामार्फत परवानगी दिली जाते. परंतु पुनर्रोपित झाडे करण्यास परवानगी दिल्यानंतरही त्या झाडांची योग्यप्रकारे देखभाल केली जात नाही. परिणामी ती झाडे मृत पावतात. त्यामुळे पुनर्रोपित झाडे खर्‍या अर्थाने जगावीत आणि याची खबरदारी घेण्यासाठी त्यांची तीनच्या ऐवजी त्याचा देखरेख कालावधी दहा वर्षे करण्यात यावा आणि मृत झालेल्या पुनर्रोपित झाडांच्या बदल्यात तिप्पट नवी रोपटी लावली जावी, अशी मागणी काँग्रेस नगरसेविकेने केली आहे.

झाड मृत पावल्यास त्याऐवजी तिप्पट नवीन झाडे लावणे बंधनकारक

मुंबईत झाडे कापण्यास परवानगी देताना एका झाडाच्या बदल्यात दोन झाडे लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे या नियमांच्या अधीन राहून झाडे कापण्यास परवानगी दिली जाते. परंतु अनेक झाडे पुनर्रोपित करण्यास परवानगी दिल्यानंतरही, त्याचे योग्यप्रकारे पुनर्रोपण केले जात नसल्याने ती झाडे मृत पावतात. परिणामी पुनर्रोपित झाडेही नष्ट होतात. त्यामुळे पुनर्रोपित झाडे जगली पाहिजे यासाठी त्या झाडांची काळजी तीन वर्षे घेणे आवश्यक आहे. परंतु तशी कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे तीन वर्षांऐवजी हा कालावधी दहा वर्षे करावा तसेच या कालावधीत पुनर्रोपित झाड मृत पावल्यास त्याऐवजी तिप्पट नवीन झाडे लावणे बंधनकारक करण्याच्या दृष्टीकोनातून अधिनियमांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

- Advertisement -

…यामुळे पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल

सध्या मुंबई महापालिकेसह एमएमआरडीए, एमएसआरडिसी, एसआरए आदींच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प तसेच खासगी विकासकांच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प राबवले जातात. परंतु हे विकास प्रकल्प राबवताना, बाधित होणारी झाडे हटवावी लागतात. यामध्ये काही झाडे कापणे तसेच काही झाडे पुनर्रोपित करावी लागतात. त्यामुळे यासाठी जाचक अटी घातल्यास खर्‍या अर्थाने पुनर्रोपित झाडे जगवण्यात महापालिकेला यश येईल आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असेही जामसूतकर यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.


हेही वाचा – सात दिवसांपेक्षा अधिक काळ फाईली अडकवू नका – बच्चू कडू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -