घरटेक-वेकव्हॉट्स अॅप'चे दोन नवे फिचर्स

व्हॉट्स अॅप’चे दोन नवे फिचर्स

Subscribe

व्हॉट्स अॅपनं दोन नवीन फिचर्स आणले आहेत. त्यापैकी पहिल्या फिचरचं नाव आहे 'मार्क अॅन्ड रीड' आणि दुसऱ्या फिचरचं नाव आहे 'म्यूट बटण'.

व्हॉट्स अॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी वापर सोपा होण्यासाठी नवीन फिचर आणत असतं. यावेळीदेखील व्हॉट्स अॅपनं दोन नवीन फिचर्स आणले आहेत. त्यापैकी पहिल्या फिचरचं नाव आहे ‘मार्क अॅन्ड रीड’ आणि दुसऱ्या फिचरचं नाव आहे ‘म्यूट बटण’. या दोन्ही फिचर्सच्या मदतीनं अॅपच्या नोटीफिकेशनद्वारे मार्क अॅन्ड रीड आणि म्यूट करता येईल. या फिचरला व्हॉट्सअपच्या अॅन्ड्रॉईड बीटा वर्जनवर रोलआऊट करण्याला सुरुवात झाली आहे.

कसे आहेत नवे फिचर्स?

हे फिचर आल्यानंतर युजर्स नवा व्हॉट्स अॅप मेसेज आल्यानंतर नोटिफिकेशन्स पॅनलवरूनच आपल्याला हवी ती अॅक्शन घेऊ शकतात. फेसबुकनं या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं आपल्या लेटेस्ट व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉईड बीटा अॅपवर म्यूट बटण अॅक्टिव्ह करण्यात आलं आहे. हा पर्याय युजर्स नोटिफिकेशमध्ये तेव्हाच दिसेल जेव्हा त्यांना एका कॉन्टॅक्टमधून ५१ पेक्षा अधिक मेसेज आलेले असतील. ज्या लोकांना मेसेज वाचण्यासाठी सतत फोन ओपन करायला आवडत नाही, त्या युजर्ससाठी हे फिचर जास्त चांगले उपयोगी आहे. यापूर्वी युजर्सना रिप्लायचा पर्याय नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला होता. त्यामुळं तिथूनच रिप्लाय करता येऊ शकत होता आणि आता युजर्सना मार्क अॅन्ड रीड आणि दुसरं म्यूट बटण उजव्या बाजूला दिसेल.

- Advertisement -

असं वापरता येईल फिचर

व्हॉट्सअॅप संदर्भात अपटेड देणाऱ्या WABetaInfo अहवालानुसार, हे नवं फिचर व्हॉट्सअॅपच्या अॅन्ड्रॉईड वर्जन २.१८.२१६ मध्ये देण्यात येत आहे. अॅपचं बीटा वर्जन अपडेट केल्यानंतर या फिचरचा तुम्हाला वापर करता येऊ शकेल. पण तुम्ही बीटा टेस्टर नसाल, तर या फिचरचा औपचारिकरित्या वापर करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. म्यूट बटण मात्र सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. मात्र, मार्क अॅज रेड बटण अजूनपर्यंत बीटा टेस्टर्ससाठी रिलीज करण्यात आलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -