घरमहाराष्ट्रमहाशिवरात्रीला महादेवाचा डोंगर पेटला!

महाशिवरात्रीला महादेवाचा डोंगर पेटला!

Subscribe

दरवर्षी वणवे तरी दुर्लक्ष

दरवर्षी तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एकापाठोपाठ वणवे लागतात आणि अवघे सृष्टीसौंदर्य हरवते. ओकेबोके झालेले, काळेकुट्ट पडलेले डोंगर, प्रचंड प्रमाणावर जळून खाक झालेली वनसंपदा यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. पर्यावरणाचे संतुलन बिघडत असताना याकडे मात्र शासकीय किंवा सामाजिक स्तरावर कोणीही दखल घेत नसल्याने दरवर्षी डोंगरात वणवे लागण्याचा सिलसिला सुरूच राहतो. ऐन महाशिवरात्रीच्या रात्री चरईजवळच्या महादेवाच्या डोंगरात लागलेला वणवा पुढील वणव्यांची नांदी मानली जात आहे.

या वणव्यात आईन, किंजळ, पांगारा, भेंडी, पळस, सावर, आंबा, चिंच, फणस, निंबारा, हेळा, पिंपळ, वड, साग, नांदरूक, गुलमोहर, शेवगा, जांभूळ, आपटा, उंबर, बोर, शिवण, अडुळसा, आघाडा, बेहडा, कुडा, बिबवा, आवळा, कोकम, कडूलिंब अशा अनेक जातींची वनौषधी झाडे जी तालुक्यातील डोंगर परिसरात विपुल प्रमाणात आढळतात ती दरवर्षी जळून खाक होतात. या शिवाय पक्षी, प्राणीही मरतात.

- Advertisement -

सहजपणे नजरेस पडणारा लांडोरींचा थवा, तसेच लाव्हा, कवडा, सुतार, कोकीळ, कोतवाल, बगळा, घार, गरुड, पोपट, रानकोंबडी, चिमणी यासारखे पक्षी आहेत. ससा, भेकर रानमांजर, रानडुक्कर, कोल्हा, तरस या प्राण्यांचे अस्तित्व टिकून असून बिबट्याही आपले अस्तित्व काही भागांतून दाखवत असतो. कांडर, धामण, मण्यार, फुरसे, अजगर, नाग अशा विविध जातीच्या सापांचे वास्तव डोंगर भागात आहे. ही दौलत वणव्यातून होरपळून निघते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -