घरफिचर्सराजकारणाचे बदलते स्वरूप, सोशल मीडियाचा वाढता वापर

राजकारणाचे बदलते स्वरूप, सोशल मीडियाचा वाढता वापर

Subscribe

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण आजपर्यंत चालू असलेले राजकारण पाहिले तर त्याचे मुद्दे कदाचित तेच आहेत असे लक्षात येईल. पण काही महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकांनी मुंबईच्या राजकारणाचा तर संपूर्ण कायापालटच करून टाकला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण राजकारणाचे स्वरूप बदलले आहे आणि त्याला मुंबईदेखील अपवाद नाही. राजकारणाला खरी सुरूवात होते ती मुंबई आणि महाराष्ट्रातूनच असेही म्हटले तर अतिशयोक्ती नसेल. याचाच आढावा घेतला आहे सदर लेखातून

गेल्या काही वर्षांमध्ये आपण राजकारणाचे बदलते स्वरूप पाहात आहोत. त्याचे सर्वात मोठे कारण जर काही असेल तर सोशल मीडियाचा वाढता वापर. राजकारण सध्या व्यावसायिकतेकडे जास्त प्रमाणात झुकत आहे आणि त्याला कारणीभूत ठरत आहे बदललेले तंत्रज्ञान, मतदार, वाढलेल्या अपेक्षा. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाची गणितं बदलताना दिसून येत आहेत. यासाठी सर्वात जास्त जबाबदार ठरली ती 2014 ची निवडणूक. यासाठी सर्वात महत्त्वाचं काम केलं आहे ते सोशल मीडियाने. काही प्रमाणात सुशिक्षित वर्ग राजकारणापासून अलिप्त झाला होता पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तरूण पिढीदेखील राजकारणात जास्त रस दाखवू लागली आहे. अनेक ठिकाणी घडणार्या घटना, त्यावर तरूणांची राजकीय घोषवाक्य, विनोद, मिम्स आणि व्हिडिओ या सर्वच गोष्टींनी अक्षरशः राजकारणाची नोंद घेण्यास भाग पाडलं आहे. राजकारण म्हणजे नक्की काय यामध्ये आता लोक जास्त प्रमाणात हिरीरिने भाग घेऊ लागले आहेत.

राजकारण, राजसत्ता, राजकीय पद्धती या समाजामध्ये सामाजिक गरजा भागविण्यासाठी गरजेच्या असतात. यामध्ये एक राजकीय दृष्टीकोन, राजकीय जाणीव तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात. या सगळ्यातील स्थित्यंतरे ही सत्ताबदलासाठी पोषक ठरतात. राजकारण हे मुंबईचे असो, महाराष्ट्राचे असो वा भारताचे. या सगळ्यामध्ये बदल झाला आहे हे नक्की. आताच्या निवडणुकीत सत्तेसाठी काहीही असाच काहीसा दृष्टीकोन पक्षांचा दिसून आला. सत्ता मिळविण्यासाठी कोणीही कोणत्याही थराला जाऊ शकतो. कोण कधी इथे राजा असेल आणि कोण कधी इथे रंक ठरेल हे सर्व काही ठरते ते सत्तेच्या बदलत्या गणितावरून. मुंबईमध्ये शिवसेना ही नेहमीच प्रबळ होती पण आताच्या निवडणुकीत सर्व पक्षांचे रंग दिसून आले. हे सर्व घडून आले ते बदलत्या राजकारणाच्या स्वरूपामुळेच.

- Advertisement -

गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि नेते हे सामाजिकदृष्ट्या अधिक अ‍ॅक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राजकारणाचे स्वरूपही बदलत आहे. खर्या अर्थाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीने सर्व उलथापालथ केली. यामध्ये सर्वात मोठा वाटा होता तो फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अप यासारख्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांचा. कोणते फोटो कधी पोस्ट करायचे त्याखाली काय लिहायचे, काय ट्रेंडिंग करायचे, लोकांना आपल्याकडे कसे आकर्षित करून घ्यायचे हा सर्व सोशल मीडियाचा खेळ खर्या अर्थाने राजकारणामधील बदलासाठी पूरक ठरला. युवकांसाठी ही संधी फायदेशीर ठरली आणि आता बघायला गेलं तर राजकारणात जास्त प्रमाणात युवक येऊ लागले आहेत. केवळ राजकारण करण्यासाठी नाही तर समाजसेवेसाठीही युवक आता पुढे येऊ लागले आहेत. याचे कामकाज कसे चालायला हवे यावरही राजकीय पक्ष आता वेळ काढू लागले आहेत. याकडे विशेष लक्ष देण्यासाठी युवकांची नियुक्ती होत आहे. रोज काही ना काही राजकीय पक्षांमध्ये घडत असते आणि त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग करून घेता येत आहे. हे काम अतिशय जबाबदारीचे आणि तितकेच जोखमीचेही आहे. कारण खरी माहिती, फोटो आणि गोष्टी जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम असते. यामुळे राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत असते.

राजकारण म्हणजे काही खायचे काम नाही हे नक्की. रोज काही ना काही घडत असते. प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे चिखलफेक होत असते. ती झेलायची आणि तितक्याच ताकदीने समोरच्या पक्षाला उत्तर द्यायची तयारी ही प्रत्येक नेत्यामध्ये असावी लागते. उठसूठ कोणीही नेता होऊ शकत नाही. कोणत्या क्षणी कोणावर पलटवार करायचा याचीही माहिती आणि तितकी क्षमता असावी लागते. त्यामुळे आताच्या राजकारणामध्ये अनेक नेते कसलेले असले तरीही त्यांना टक्कर देण्यासाठी युवा पिढीही तयार दिसून येत आहे. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणामध्ये बराच फरक आलेला दिसून येत आहे. पक्षातील सर्वांना आपल्यासह एकसाथ घेऊन जाण्यासाठी सतत सतर्क राहावे लागते. पूर्वीच्या राजकारणात एकदा एका पक्षात गेले की त्या पक्षाला शेवटपर्यंत धरून ठेवण्यातच धन्यता होती. आता मात्र समाजकारणासह राजकारण करत स्वतःचे खिसेही तितकेच भरण्यात काही राजकारणी धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. केवळ इतकेच नाही तर आपल्याला हव्या असणार्या पदासाठी कधीही कोणत्याही पक्षामध्ये पक्षांतर करण्यासाठीही आताचे नेते आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दहा वर्षात अनेक नेत्यांनी सतत पक्षांतरे केलेली दिसून आली आहेत. कदाचित याचमुळे राजकारणाचे स्वरूप जास्त प्रमाणात बदललेले दिसून येत आहे.

- Advertisement -

साधारण तीन दशकांपूर्वी असणारे राजकारण हे ज्या प्रकारचे होते ते लक्षात घेतले तर विरोधी पक्षांची आघाडी ही अपरिहार्य होती. पण आताचे राजकारण पाहता सर्वच बदलले असल्याचे लक्षात येत आहे. या बदललेल्या राजकारणातील स्वरूपामुळे सर्जनशील काम करणार्या लोकांसाठीही या क्षेत्रामध्ये आता संधी उपलब्ध झाल्या आहेत. राजकीय पक्ष आणि नेते यांना पुढे येण्यासाठी विविध आणि हुशार लोकांची गरज भासू लागली आहे. अनेक घोषवाक्य तयार करण्यापासून ते कोणत्या रंगाचे कपडे कोणत्या सभेसाठी घालायचे काय बोलायचे या सगळ्यासाठीच आता नवनवीन एजन्सी अथवा पीआरची मदत घेण्याचे कामही गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. कोणत्या सभेत कोणत्या देहबोलीत बोलायचे, भाषेचा वापर कसा सुयोग्य करायला हवा या सगळ्याचा विचार अगदी योग्य तर्हेने करण्यात येतो. राजकारण हादेखील आता बदलून एक प्रकारचा व्यवसाय झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यामध्ये याची गरज नक्कीच वाढत जाणार आहे. राजकारणाच्या या बदलत्या स्वरुपामुळे आता याकडे एक करिअर म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे. अगदी महाविद्यालयातील राजकारणही गेल्या काही वर्षांमध्ये वाढले असून तरूण पिढी यामध्ये भाग घेऊ लागली आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त प्रमाणात युवा पिढी राजकारणात टेक ओव्हर करत असल्याचेही दिसून येत आहे. यापेक्षा अधिक चांगला बदल तो काय असणार?

काही प्रमाणात महिलांंचे नेतृत्व आणि त्यांचाही सहभाग राजकारणात वाढल्याने एक वेगळी दिशा मिळाली आहे. महिला आणि पुरूष एकमेकांच्या मदतीने राजकारणात भाग घेऊन समाजाला जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही दिसून येते. तर काही ठिकाणी केवळ राजकारण करून परिस्थिती बिघडत असल्याचेही दिसून येते. पण त्याचा अर्थ राजकारण करूच नये असा होत नाही. तर यामुळेच राजकारणामध्ये बदल घडला असून त्याचे स्वरूप बदलल्याचे दिसून आले आहे. आता भविष्यात हे बदललेले राजकारणाचे स्वरूप नक्की कुठे आणि कसे वळणार हे येणारा काळच ठरवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -