घरताज्या घडामोडीरोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना 'करोना'चा धोका

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना ‘करोना’चा धोका

Subscribe

पुण्याच्या एनआयव्ही प्रमाणे आता मुंबईसह नागपूरच्या इंदिरा गांधी या हॉस्पिटलमध्येही करोनाची चाचणी केली जाणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र राज्य करोनासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय, पुण्याच्या एनआयव्ही प्रमाणे आता मुंबईसह नागपूरच्या इंदिरा गांधी या हॉस्पिटलमध्येही करोनाची चाचणी केली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अजोय महेता यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आता चीनसह १२ देशातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा १४ दिवसांपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. त्यातील एखाद्याला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करुन नमूने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवले जातात. त्यानंतर, नमुना निगेटीव्ह आल्यास त्या प्रवाशाला डिस्चार्ज दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मास्क लावण्याची गरज नाही

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी होत असून आवश्यकता असल्यास अधिकचे मनुष्यबळ तेथे पुरवण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी महानगरपालिका आणि संबंधित विभागांना दिले. नागरिकांनी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, विशिष्ट अंतरावरुनच इतरांशी संवाद साधावा, खोकतांना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. अशा सूचना मोठ्या प्रमाणावर प्रसारित कराव्यात, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण न पसरता खबरदारी घेतली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्ड

जिल्हा हॉस्पिटलमध्ये विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले असून त्या ठिकाणी पुरेशा साधन सामग्री उपलब्ध आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये बंदरे आहेत तेथे परदेशातून येणाऱ्या जहाजांवरील प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.

- Advertisement -

विषाणूचा प्रादूर्भाव पसरु नये यासाठी प्रयत्न

राज्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडी बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याबाबत आणि कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. सामुहिक समारंभ, जत्रा, यात्रा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, असे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचना मुख्य सचिव यांनी केली.


हेही वाचा – आता बांगड्या, बिस्किटांमधूनही अंमली पदार्थांची तस्करी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -