घरताज्या घडामोडीआता बांगड्या, बिस्किटांमधूनही अंमली पदार्थांची तस्करी

आता बांगड्या, बिस्किटांमधूनही अंमली पदार्थांची तस्करी

Subscribe

उडता महाराष्ट्र होऊ देणार नाही - गृहमंत्री अनिल देशमुख रत्नागिरीत पडकलेलं कोकेन निघालं युरिया

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीबद्दल विधानपरिषदेत खुलासा केला होता. कुरियरच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आतातर बिस्किटे, निमंत्रण पत्रिका, हातातील बांगड्या या वस्तूंच्या माध्यामातूनही अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावर बिस्किटे आणि मटणाच्या तुकड्यातून परकीय चलनाची तस्करी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता बिस्किटे, बांगड्यामधून अंमली पदार्थही आणले जात असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाचं संकट होळीत जळून खाक होईल!

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी लक्षवेधी सूचना मांडून तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन वाढल्याचा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर आज पुन्हा गाडगीळ यांनीच याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत बोलत असताना देशमुख यांनी सांगितले की, राज्यात अंमली पदार्थांची तस्करी विविध मार्गाने होत आहे, कुरियरप्रमाणेच बिस्कीट, लग्नाची निमंत्रण पत्रिका, बांगड्या यांसारख्या वस्तूंमधून अंमली पदार्थांची तस्करी होत आहे.

उडता महाराष्ट्र होऊ देणार नाही

या चर्चेत भाग घेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उडता पंजाब या चित्रपटाचे उदाहरण दिले. महाराष्ट्रात जर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होत असेल तर एके दिवशी उडता महाराष्ट्र होईल, असे ते म्हणाले. यावर आम्ही उडता महाराष्ट्र होऊ देणार नाही, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले. अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून ड्रग्ज फ्री कॅम्पस उपक्रम राबविला जात आहे. तसेच अंमली पदार्थाचे सेवन व विक्री करणार्‍यांच्या विरोधात एनडीपीसी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते.

- Advertisement -

हेही वाचा – नवी मुंबईत डिटेंशन कॅम्प होणार; पण CAA-NRC साठी नाही

रत्नागिरीत पडकलेलं कोकेन निघालं युरिया?

नोव्हेंबर २०१९ साली रत्नागिरी जिल्ह्यात हरियाणा आणि राजस्थान मधील ३ जणांना कोकेन बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तटरक्षक दलाचेही काही जवान आरोपी आहेत. मात्र, हे कोकेन कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी दिले असता सदर वस्तू कोकेनचा साठा नसून युरिया खत असल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला. या अहवालावर विधानपरिषद सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या सर्व प्रकरणाची पोलीस महानिरीक्षकांकरवी सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -