घरदेश-विदेशराजस्थानमध्ये जमावाने केली तरुणाची हत्या, गो-तस्करीचा होता संशय

राजस्थानमध्ये जमावाने केली तरुणाची हत्या, गो-तस्करीचा होता संशय

Subscribe

गो-तस्करीच्या संशयावरुन राजस्थानमध्ये जमावाकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. देशात मॉब लिंचिंगची घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. राजस्थानमधील ही एक दुसरी घटना आहे.

गो-तस्करीच्या संशयावरुन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका तरुणाची जमावाकडून निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. देशात मॉब लिंचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. राजस्थानमध्ये जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अकबर असे सांगितले जात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये अकबर हा हरियाणाच्या कुलगावचा रहिवासी आहे.

स्थानिकांना लागला होता सुगावा

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रामगड गावात हा सगळा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री जमावाने एकत्र येत त्याला गायींची तस्करी करण्याच्या संशयावरुन अकबरला निघृणपणे मारहाण केली. या मारहाणीत अकबरला आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना या घटनेचा सुगावा लागताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या तपासणीत असे समजले की, गायींची तस्करी करणारी व्यक्ती आपल्या गावाकडे येत असल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिकांना मिळाली होता. त्यानंतर गावातील बरेच नागरिक एकत्र आले. त्यानंतर लोकांनी रस्त्यावर अकबरला बघताच क्षणी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

आरोपींना लवकरच अटक होईल – पोलीस दल

या घटनेनंतर सध्या पोलिसांनी पुराव्याअभावी कुणालाही अटक केलेली नाही. हरयाणाचे एएसपी अनिल बेनिवाल यांनी सांगितले की, ‘अजूनपर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, मृत व्यक्ती गायींची तस्करी करत होता की नाही. मृत व्यक्तीचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस आरोपींना ओळखण्याचा प्रयत्न करत आहे, या प्रकरणी पोलीस लवकरात लवकर आरोपींना अटक करतील’.

- Advertisement -

याअगोदरही मॉब लिंचिंग घटना

याअगोदरही २०१७ मध्ये राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या बिदरमध्ये गुगल सारख्या कंपनीत काम केलेल्या इंजिनिअरची देखील जमावाने हत्या केली होती. मध्य प्रदेशच्या उन्नावमध्येही गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावाकडून एकाची हत्या करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्याच्या राईनपाडामध्येही पाच जणांची मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -