घरटेक-वेकफेसबुक बनवणार स्वतःचा उपग्रह

फेसबुक बनवणार स्वतःचा उपग्रह

Subscribe

नासा आणि स्पेस एक्सनंतर आता सर्वात मोठी सोशल साईट म्हणून ओळखले जाणारे फेसबुक ही नवीन उपग्रहाची निर्मीती करणार आहे. इंटरनेट कनेक्शनसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. देशातील दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवणे हे उग्रहाचे मुख्य कार्य असेल. २०१६ ते २०१८ मध्ये एफसीसी कंपनी आणि फेसबुकमध्ये ई-मेलव्दारे झालेल्या संवादातून माहिती समोर आली. यापूर्वी कंपनी उपग्रह बनवत असल्याची बाममी अफवा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र माहिती अधिकारा अंतर्गत फेसबुक उपग्रह बनवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही २०१६ मध्ये फेसबुकने स्वतःचे उपग्रह आवकाशात पाठवण्याचा प्रयत्न केला होता. हा उपग्रह स्पेस एक्सच्या रॉकेटमधून पाठवण्यात येणार होता. मात्र परिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात हा उपग्रह नष्ट झाला. याघटनेनंतर फेसबुकने उपग्रहावर कधीच वाच्यता केली नाही.

देशातील दुर्गम भागात इंटरनेट कनेक्शन पोहचवण्यासाठी या उपग्रहावर फेसबुकने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उपग्रहातून सिग्नलच्या माध्यमातून लोकांना इंटरनेट पुरवले जाईल. उपग्रह बनवण्यापूर्वी फेसबुकने अक्विला उपक्रमाअंतर्गत इंटरनेट सिग्नलचे परिक्षण केले होते. देशातील दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडला फेसबुकची नवीन व्यवसायीक धोरण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या फेसबुकचे २ अब्जाहून अधिक युजर्स आहेत. अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी फेसबुक नव्या पद्धतींचा वापर करतेय. त्यामुळे फेसबुकच्या वापरकर्त्यांचा आकडा वाढत चालला आहे.

- Advertisement -

फायबर ऑप्टीक केबल्समध्ये गोल्ड स्टॅडर्ड असल्यामुळे इंटरनेटचा स्पीड चांगला मिळतो. मात्र त्या अधिक खर्चिक आहेत. जगात सर्व ठिकाणी वायरी पसरवून इंटरनेट देणे शक्य नसल्यामुळे उपग्रहाच्या सहाय्याने सिग्नल्सचा वापर करुन इंटरनेट पोहचवले जाईल. हा उपग्रह बसच्या आकारा ऐवढा आहे. या उपग्रहातून मिळणाऱ्या सिग्नल्समुळे चांगल्या दर्जाचे इंटरनेट पुरवले जाणार असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले. हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेपासून १ हजार २५० मैल दूर कार्यरत रहाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -