घरताज्या घडामोडीCorona Update: १८ तासात पुण्याची दोन हजार वाहने नाशिकमध्ये; थर्मल स्कॅनिंग करा

Corona Update: १८ तासात पुण्याची दोन हजार वाहने नाशिकमध्ये; थर्मल स्कॅनिंग करा

Subscribe

प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग सक्तीची करा - रतन जाधव

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढत आहे. राज्यात करोनाचे ९७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबई आणि पुण्याचे रुग्ण जास्त आहेत. यामुळे नागरीकांनी मुंबई-पुणे शहरे सोडायला सुरुवात केली आहे. त्यात सोमवारी २३ मार्च रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग बंद केल्याने पुण्यातील नागरीकांचे कालपासुन नाशिक व इतर जवळच्या शहरात स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी मध्यरात्री १२ नंतर सोमवारी रात्री उशिरा पर्यंत १८७० चारचाकी वाहने शिंदे टोलनाक्यावरुन पुणे-हवेली (एमएच १२) व पिंपरी-चिंचवड (एमएच १४) या पासिंगच्या हजारो गाड्या नाशिक शहरात आल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाचे लोक या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. सोमवारी सकाळी काही वाहन चालकांची थर्मल स्कॅनिंग केली गेली. परंतू नंतर कोणतीही दक्षता घेतली नसल्याचे सांगण्यात आले.


हेही वाचा – Coronavirus: राज्यात करोनाचे ८ नवे रुग्ण; करोनाग्रस्तांची संख्या ८९ वरुन ९७ वर

- Advertisement -

पुण्यात करोनाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे, हे प्रशासनाला माहिती असताना पुण्याहुन येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची टोल नाक्यावर तपासणी होणे आवश्यक असुन ती सक्तीची करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणिस रतन जाधव यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -