घरCORONA UPDATEकोरोना व्हायरस : मुंबईकर कोकणवासीयांच्या मदतीला धावले नारायण राणे

कोरोना व्हायरस : मुंबईकर कोकणवासीयांच्या मदतीला धावले नारायण राणे

Subscribe

राज्यासह देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन घेण्यात आला असून, सध्या नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे.

राज्यासह देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन घेण्यात आला असून, सध्या नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. याच लॉकडाऊनमुळे मुंबईकर कोकणवासीय देखील मुंबईत अडकून पडले आहेत. त्यामुळे मुंबईत जागेची गैरसोय असलेला कोकणी माणूस कोकणात कसे जाता येईल. याचा चाकरमानी विचार करत असताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार गैरसोय होणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावून आले असून, आता मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना नारायण राणे यांच्याकडून मदत केली जाणार आहे.

सरकारने प्रवासाला बंदी घातल्यामुळे कोकणात पाठवणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे थांबणे हे तुमच्या आणि सर्वांच्या दृष्टीने हिताचे असल्याचे सांगत नारायण राणे यांनी तुम्हाला जी काही मदत लागेल ती सर्वोतोपरी केली जाईल. फक्त तुम्ही घरात थांबा, असे मुंबईकर कोकणवासीयांना आवाहन करण्यात आल्या आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, कल्याण या भागात सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत सरकारने प्रवासाला बंदी घातली असल्याने कोकणात गावी पाठवणे शक्य नसल्याने कोकणवासीयांना मुंबईत जिथे आहात, तिथेच थांबा. हेच तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आहे. अन्नधान्य, वैद्यकीय मदत, औषधे व इतर कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल तर खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

मुंबई शहर आणि उपनगर

नामदेव चव्हाण (वांद्रे ते बोरिवली ) – ९०२९०५८८८१
प्रशांत सुधाला (वांद्रे ते बोरिवली) – ९९३०९८४४४१
योगेश होळकर (चेंबूर ते मुलुंड) – ९९३००७३५५५
विक्रांत आचरेकर (दक्षिण मुंबई) – ९६९९००००९०
हर्षद पाटील (दक्षिण मुंबई) – ९८७०२८४४४४

- Advertisement -

नवी मुंबई

कमलेश राणे – ९९६७७१०९९९

मीरा – भाईंदर, वसई-विरार

मनोज राणे – ९८१९९८१५८१

ठाणे, कल्याण-डोंबिवली

विजय त्रिपाठी ९००४८४४०५९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -