घरCORONA UPDATEधर्मग्रंथ वाचल्याने कोरोना बरा होतो, नर्सचाच रुग्णाला अचाट सल्ला!

धर्मग्रंथ वाचल्याने कोरोना बरा होतो, नर्सचाच रुग्णाला अचाट सल्ला!

Subscribe

विशिष्ट धर्मग्रंथ वाचल्यामुळे कोरोना बरा होतो, असा धक्कादायक सल्ला एका नर्सनेच रुग्णालयात आलेल्या रुग्णाला दिल्याचा प्रकार कल्याण पूर्वमध्ये घडला आहे.

एकीकडे आख्खं जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं असताना आणि निदान आजतागायत तरी कुणाला कोरोनावरचं औषध
किंवा लस सापडली असताना कल्याण पूर्व भागात असलेल्या एका सरकारी दवाखान्यामध्ये चक्क एका नर्सनेच यावर एक
भयंकर उपाय सांगितला आहे. विशिष्ट धार्मिक ग्रंथ वाचल्यामुळे कोरोना बरा होतो, असा भयंकर सल्लाच या नर्सने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना द्यायला सुरुवात केली. या प्रकाराची तक्रार जेव्हा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली, तेव्हा कुठे हा भयंकर प्रकार समोर आला!

पोलिसांत तक्रार दाखल

कल्याण पूर्वेच्या नेतिवली भागात हा सरकारी दवाखाना आहे. या दवाखान्यात उपचारांसाठी रुग्ण आले, की ही नर्स रुग्णांना विशिष्ट धार्मिक ग्रंथांचं वाचन केल्यामुळे कोरोना बरा होतो, अस अजागळ सल्ला द्यायला सुरुवात केली. यासंदर्भात तक्रारीचा अर्ज रविवारी मुख्य आरोग्य अधिकारी धीरज गुप्ता यांच्याकडे दाखल करण्यात आला. या नर्सविरोधात कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित दवाखान्यातील नर्सविरोधात पोलिसांत देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे संबंधित रुग्णालय आणि कल्याण पूर्व परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नागरिकांमधून संताप व्यक्त

या अर्जाबाबत मुख्य आरोग्य आधिकारी धीरज गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार अर्जाबाबत दुजोरा देत
सांगितले की ‘सोमवारी अर्जाबाबत संबंधित नर्सची चौकशी करण्यात येणार असून चौकशी अंती शहानिशा करून ती दोषी
आढळल्यास तिला मेमो देण्याची कारवाई करण्यात येईल’. मात्र, एकीकडे कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, इतर आरोग्य कर्मचारी आणि इतर सरकारी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असतानाच वैद्यकीय पेशातील नर्सने केलेल्या अशा या कृत्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Corona: वाशी APMC मार्केटची गर्दी टळेना; अखेर निर्णय झालाच!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -