घरCORONA UPDATEधक्कादायक: कोरोनाच्या उद्रेकानंतर मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ

धक्कादायक: कोरोनाच्या उद्रेकानंतर मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ

Subscribe

भारतीय मानसोपचार कमिटीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मानसिक आजाराने पीडित झालेल्यांमध्ये अचानक २० टक्क्यांपर्यंत वाढ झालेली दिसून आली आहे.

देशात कोरोना व्हायरसच्या आजारानंतर मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय मानसोपचार कमिटीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, मानसिक आजाराने पीडित झालेल्यांमध्ये अचानक २० टक्क्यांपर्यंत वाढ झालेली दिसून आली आहे. सर्वेक्षणानुसार, प्रत्येक पाचपैकी किमान एक भारतीय मानसिक आजाराने ग्रस्त आहे. कोरोना व्हायरस जगभर पसरत आहे. त्यामुळे जगातील जीवनशैली आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. जग कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देत आहे. अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्याचा जगातील लाखो लोकांवर परिणाम झाला आहे.


हेही वाचा – कोरोना संशयितांना आता १४ नााही तर २८ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवणार

- Advertisement -

या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की अशा रूग्णांमध्ये सरासरी १५ ते २० टक्क्यांची वाढ फक्त एका आठवड्यात झाली आहे. कोरोनाचा उद्रेक हे एक कारण आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्व कंपन्या बंद झाल्या आहेत. अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. ज्यामुळे लोकांचे व्यवसाय, नोकरी, कमाई, बचत किंवा मूलभूत संसाधने गमावण्याच्या भीतीने लोक जगत आहेत. दरम्यान हा एक वाढता आलेख आहे. काही दिवसात याचे गंभीर परिणाम दिसून येतील, असे फोर्टिस हॉस्पिटलमधील मानसिक आरोग्य व वर्तणूक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. मनु तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. ते मर्यादित स्त्रोतांसह घरातच राहत आहेत. आता ते चिंता, पॅनीक हल्ले आणि अल्कोहोल विथड्रॉल सिंड्रोममुळे ग्रस्त आहेत, असे डॉ. मनु तिवारी म्हणाले.

अश्या प्रकारे आपण चिंताग्रस्त विकार आणि पॅनीक हल्ले ओळखू शकता

  • वस्तुस्थिती तपासत आहे व ती पुन्हा तपासत आहे.
  • काहीतरी वाईट घडू शकते या भावनेने निद्रानाश.
  • पुन्हा पुन्हा भूतकाळात जाणे.
  • जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल दोषी भावना.
  • चिडचिडेपणा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -