घरCORONA UPDATECorona: अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप्सची सेटिंग बदलली!

Corona: अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप्सची सेटिंग बदलली!

Subscribe

१ एप्रिलच्या निमित्ताने कोरोनाच्या नावाने कुणी फसवणारे एप्रिल फूल करणारे मेसेज पाठवू नये, म्हणून हजारो व्हॉट्सअॅप अॅडमिन्सनी आज ग्रुपची सेटिंग बदलल्याचं पाहायला मिळत आहे.

एरवी आजच्या दिवशी व्हॉट्सअॅप ग्रुप फसवणाऱ्या मेसेजेसनी भरलेले असतात. कारण आज आहे १ एप्रिल. एप्रिल फूल
करण्यासाठी सगळेच तयारीत असतात. पण सध्या राज्यात, देशात आणि जगभरात ओढवलेल्या कोरोनाच्या महासंकटाच्या
पार्श्वभूमीवर १ एप्रिल रोजी एप्रिल फूल बनवणारे कोरोनाबाबतचे मेसेज कुणीही पाठवू नयेत, अन्यथा मेसेज पाठवणाऱ्या व्हॉट्सअॅपमधल्या सदस्यांसोबतच ग्रुपच्या अॅडमिनविरोधात देखील कारवाई करण्यात येईल, असे निर्देश राज्याच्या
गृहविभागाने दिल्यानंतर सगळ्याच व्हॉट्सॅप ग्रुप अॅडमिन्सनी कंबर कसली आहे. त्यामुळे आपल्या व्हॉट्सॅपवरचे अनेक ग्रुपवरचे सेटिंग्ज आज आपल्याला बदललेले दिसून येतील.

whatsapp Group Settings2 whatsapp Group Settings1 whatsapp Group Settings

- Advertisement -

आपल्या व्हॉट्सॅप ग्रुपवर ‘Only Admins Can Send Messages’ अर्थात फक्त अॅडमिन या ग्रुपवर मेसेज पाठवू शकतात, असे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. १ एप्रिलच्या निमित्ताने कुणीही एप्रिल फूल करणारे मेसेज पाठवून कोरोनाबाबत अधिक अफवा पसरवू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात कालच निर्देश दिले होते. त्यामुळे लागलीच अनेक ग्रुप अॅडमिन्सनी आपल्या ग्रुप्सवरचे सेटिंग्ज बदलले आहेत.


वाचा सविस्तर : सावधान! एप्रिल फुल करणे पडणार महागात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -