घरदेश-विदेश'लॉकडाऊन'दरम्यान बाळाचा जन्म; नाव ठेवलं 'लॉकडाऊन'!

‘लॉकडाऊन’दरम्यान बाळाचा जन्म; नाव ठेवलं ‘लॉकडाऊन’!

Subscribe

लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी देवरियामध्ये झाला बाळाचा जन्म

संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सरकारने कोणताही निर्णय जाहीर केल्यावर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर हा होतच असतो. याचेच एक उदाहरण उत्तर प्रदेशातील देवरिया या गावात बघायला मिळाले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी देवरियामध्ये एका बाळाचा जन्म झाला. या नवजात बाळाच्या कुटुंबियांनी त्याचे नाव थेट ‘लॉकडाऊन’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला.


CoronaVirus: ‘LockDown’ मध्ये घराबाहेर पडताय; कपाळावर बसेल ‘हा’ शिक्का!

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय देशाच्या फायद्याचा आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेने त्याला पूर्णतः प्रतिसाद देणे गरजेचेच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव लॉकडाउन असे ठेवले आहे.

- Advertisement -

म्हणून नाव ठेवले लॉकडाऊन

देवरियाच्या खुखुंदू गावात निवासी पवन कुमार यांची पत्नी नीरजा गरोदर होती. २८ मार्च रोजी गावातील आरोग्य केंद्रामध्ये तिने बाळाला जन्म दिला. नवजात मुलाच्या कुटुंबियांनी हे नामकरण एकमेकांच्या संमतीने केले आहे. ”देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूपासून बचावाचा संदेश देण्यासाठी आम्ही हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.” असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींचे मिशन सुरू ठेवणार

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता देशाचे पंतप्रधान महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयात आपण सहभागी व्हायला हवे. आपण देशाच्या पंतप्रधानांचे मिशन पुढे सुरू ठेवणार असल्याचे नवजात बालकाच्या कुटुंबियांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -