घरCORONA UPDATEतबलीगी जमातमधील लोक क्वारंटाईन वार्डमध्ये डॉक्टरांवर थुंकले

तबलीगी जमातमधील लोक क्वारंटाईन वार्डमध्ये डॉक्टरांवर थुंकले

Subscribe

मरकजमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, या लोकांनी वैद्यकिय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे.

दक्षिण-पूर्व दिल्लीतील रेल्वेच्या क्वारंटाईन वार्डमध्ये निजामुद्दीनमधील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या तब्बल १६० जणांना ठेवण्यात आलं आहे. मात्र, हे लोक तिथल्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याचं समोर आलं आहे. क्वारंटाईन केलेल्या काहींनी डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांवर थुंकल्याची माहिती रेल्वेच्या प्रवक्त्याने बुधवारी दिली. दक्षिण दिल्लीतील निजामुद्दीन तबलीगी जमात मुख्यालय मरकज येथून लोकांना बाहेर काढल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी तुघलकाबाद येथील रेल्वे मालमत्तेवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या क्वारंटाईन केंद्रांवर नेण्यात आलं. दरम्यान, दक्षिण दिल्लीतील तबलीगी जमात मुख्यालय मरकज हे कोरोनाचं हॉटस्पॉट म्हणून उदयास आलं आहे.

मरकजमधून क्वारंटाईन केलेल्या लोकांनी क्वारंटाईन वार्डमध्ये कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केलं. तसंच त्यांना जेवण दिलं म्हणून आक्षेप नोंदवला. ते डॉक्टरांवर आणि त्यांच्याकडे येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थुंकले. यासह त्यांच्या अवतीभोवती फिरण्यास, थांबण्यास विरोध केला, असं उत्तर रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी सांगितलं. मरकजमध्ये उपस्थित असलेल्यांना क्वारंटाईन केल्यानंतर रेल्वे कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याचे म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतीयवंशाच्या व्हायरोलॉजिस्ट गीता रामजी यांचा कोरोनामुळे मृत्यू


आम्ही दक्षिण पूर्व दिल्लीच्या जिल्हा दंडाधिकारी यांना माहिती दिली की त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करावी किंवा त्यांना इतर कोणत्याही योग्य ठिकाणी हलवावं. संध्याकाळी साडेपाच वाजता दिल्ली पोलिसांचे चार हवालदार आणि सहा सीआरपीएफ जवान पीसीआर व्हॅनसह क्वारंटाईन केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत, असं कुमार म्हणाले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -