घरCORONA UPDATEधक्कादायक! आजोबांमुळे नातीला झाला कोरोना

धक्कादायक! आजोबांमुळे नातीला झाला कोरोना

Subscribe

कोंढवा येथील ६१ वर्षीय आजोबांमुळे ३ वर्षीय नातीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आजच्या अहवालातून समोर आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर मुंबई आणि पुण्यात दररोज एक नवा कोरोना रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंढवा येथील ६१ वर्षीय आजोबांमुळे ३ वर्षीय नातीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आजच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पुण्यात एकाच दिवसात सात रुग्ण बाधित आढळले आहेत.

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी

पुण्यातील ससून रूग्णालयात ४६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेचा कोरोना बाधित झाल्याचा रिपोर्ट आला होता आणि त्यातच या महिलेचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी हा आकडा ४१६ वर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात ८१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबईतील संख्या असून मुंबईत ५७ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे १९ मृत्यू झाले आहेत. मात्र, कोरोना बाधित एकूण ४२ जणांना रविवारी घरी सोडण्यात आले आहे.


हेही वाचा – वसईत कोरोनाने घेतला पहिला बळी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -