घरCORONA UPDATELockdown : लॉकडाऊनच्या काळात महिला व बालकांच्या अत्याचारात वाढ!

Lockdown : लॉकडाऊनच्या काळात महिला व बालकांच्या अत्याचारात वाढ!

Subscribe

चाइल्डलाइफ इंडिया हेल्पलाईनच्या अहवालानुसार, २० ते ३१ मार्चदरम्यान, 'चाइल्डलाइफ १०९८' यावर ३.०७ लाख कॉल्स आले.

चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाईनच्या अहवालानुसार, २० ते ३१ मार्चदरम्यान, ‘चाइल्डलाइन १०९८’ यावर ३.०७ लाख कॉल्स आले. यामध्ये ३० टक्के म्हणजेच ९२ हजार कॉल्स शोषण आणि अत्याचार संदर्भात होते. कॉल करणाऱ्यांनी मुलांवरील होणारे अत्याचार रोखण्याची मागणी केली. चाइल्डलाइन इंडियाची उपसंचालक हरलीन वालिया या म्हणाल्या की, हा अहवाल चिंताजनक आहे. मंगळवारी जिल्ह्यातील बालक बचाव युनिटला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे माहिती देण्यात आली. कॉन्फरन्समध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयामधील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या अत्याचारात ५० टक्क्यांनी वाढ

लॉकडाऊन दरम्यान महिला अत्याचारात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी पकडून अत्याचाराची संख्या दुप्पट झाली आहे. यावेळी हरलीन वालिया म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला देशाला संबोधित केले. आणि दुसऱ्या दिवसांपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यानंतर फोन कॉल्स ५० टक्क्यांनी वाढले.

- Advertisement -

मुलांच्या अपहरणाच्या तक्रारी

वालिया यांनी बैठकमध्ये सांगितले की, मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य संबंधात ११ टक्के कॉल्स आले. बाल कामगार संबंधात आठ टक्के आणि बेघर मुलांसंदर्भात पाच टक्के कॉल्स आले आहेत. याशिवाय हेल्पलाइनवर १६७७ कॉल हे कोरोना व्हायरस संदर्भात होती, तर २३७ कॉलमध्ये आजारी लोकांसाठी मदत मागितली गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -