घरCORONA UPDATEकिचनमध्ये शिधा, फ्रीजमध्ये फळं...मग मागितलं फूकटचं रेशन

किचनमध्ये शिधा, फ्रीजमध्ये फळं…मग मागितलं फूकटचं रेशन

Subscribe

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून मोफत रेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, काहीजण आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना मोफत रेशन घेत आहेत.

देशात लॉकडाऊन असल्यामुळे गरिब, मजूर, ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांचे हाल होत आहेत. नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला. जे खरोखर गरिब आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांनाच मोफत रेशन मिळणार आहे. मात्र, काही महाभाग खोटी महिती देऊन मोफत रेशन घेत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला. उपविभागीय दंडाधिकारी यांनी हरंगला येथे एकाला पकडलं. पुन्हा असं कृत्य केल्यास तुरूंगात पाठवण्यात येईल, असा इशारा देत त्याला सोडण्यात आलं.

उपविभागीय दंडाधिकारी यांनी हरंगला येथे एका घरावर छापा टाकला. त्यावेळी किचनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा होता. तसंच फ्रीजमध्ये फळंही होती. उपविभागीय दंडाधिकारी यांनी याबाबतचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केली तेव्हा घरातील व्यक्ती रडायला लागला. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी पुन्हा असं कृत्य केल्यास तुरूंगात पाठवण्यात येईल, असा इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: सहा राज्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक; महाराष्ट्राचा मृत्यू दर किती?


लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मोठी घोषणा केली होती. गोरगरीब जनता, कामगारांसाठी १ लाख ७० हजार करोडची घोषणा केली. ८० करोड जनतेला ५० किलो रेशन मिळणार. पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत मिळणार आहेत. यासोबतच १ किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा निर्मला सितारमण यांनी केली होती. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, असं निर्मला सितारमन म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -