घरCORONA UPDATECorona: 'दृश्यम'फेम अभिनेत्री श्रिया सरन सांगतेय स्पेनमधील कोरोनाची भयाण स्थिती

Corona: ‘दृश्यम’फेम अभिनेत्री श्रिया सरन सांगतेय स्पेनमधील कोरोनाची भयाण स्थिती

Subscribe

सिनेअभिनेत्री श्रिया सरन सध्या स्पेनमधील बार्सिलोना शहरात राहत आहे. जगभरात कोरोनाच्या संकटामुळे देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यातच ही अभिनेत्री स्पेनमध्ये लॉकडाऊनमुळे अडकली आहे.

सिनेअभिनेत्री श्रिया सरन सध्या स्पेनमधील बार्सिलोना शहरात राहत आहे. जगभरात कोरोनाच्या संकटामुळे देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यातच ही दृश्यमफेम अभिनेत्री देखील स्पेनमध्ये लॉकडाऊनमुळे अडकली आहे. श्रिया तिचे पती एंड्री कोश्चिव यांच्यासोबत त्यांच्या लग्नांचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी बार्सिलोनाला गेली होती. मात्र नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती तिथेच अडकून पडली. जगभरात युरोपमधील स्पेन शहरात कोरोनाची स्थिती अतिशय भयंकर झाली आहे. अशावेळी तेथील भयाण अनुभव श्रियाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

View this post on Instagram

Love you forever and ever @andreikoscheev

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109) on

- Advertisement -

सेलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये गेले आणि…

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेल्या श्रियाने २०१८ साली एंड्री यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते बार्सिलोना येथे गेले होते. १३ मार्च रोजी हे दोघे एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले असता ते हॉटेल बंद असल्याचे आढळून आले. तेव्हा समजले की हा कोरोना खुपच भयंकर आहे. स्पेनमध्ये राहताना या कोविड-१९ च्या सावटाखाली आमचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे, असे श्रियाने सांगितले. तेव्हापासून स्पेन शहर लॉकडाऊन करण्यात आले. पोलिसांनीही तेथील नियम जाहीर केले. यामध्ये एका घरातून केवळ एकच व्यक्ती जीवनावश्यक सामान घेण्यासाठी घराबाहेर जाऊ शकतो, असे नमूद केले होते.

एंड्रीला कोरोनाची लक्षणे

श्रियाने कोरोना आजाराची लक्षणे तिच्या पतीमध्ये आढळल्याचीही माहिती दिली. एंड्री यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यांना खोकला आणि ताप येऊ लागला. यामुळे दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना पुन्हा घरी पाठवले. त्यांचे म्हणणे होते की, जर कोरोना झाला नसेल तर हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घरी परत आलो. दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिलो आणि घरीच औषधं घेतली, असेही श्रिया म्हणाली.

- Advertisement -

हेही वाचा –

आईला कोरोनाची लागण; आता नर्स घेत आहेत ३ महिन्यांच्या मुलीची काळजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -