घरताज्या घडामोडीसोलापुरात नर्समुळे ९ जणांना कोरोनाची लागण; रुग्णांची संख्या १० वर

सोलापुरात नर्समुळे ९ जणांना कोरोनाची लागण; रुग्णांची संख्या १० वर

Subscribe

रुग्णालयातील कोरोनाबाधित नर्सच्या संपर्कात आल्याने ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनाचा आकडा १० वर गेला आहे.

महाराष्ट्रात भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. यापैकी एक जिल्हा होता सोलापूर. मात्र, सोलापुरात देखील कोरोनाने शिरकाव केला असून नुकताच एका कोरोनाची लागण झालेल्या ५६ वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता एका कोरोनाबाधित नर्समुळे ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनाची संख्या १० वर गेली आहे.

सोलापुरात आज एकाच दिवशी कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. एकूण ४२ संशयित रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यात दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तर अन्य ३२ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, एका रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेच्या आणि मृत्यू झालेल्या दुकानदाराच्या संपर्कात १६९ व्यक्ती आल्या होत्या. त्यांची सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यातील १६६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. तर त्यातील एक व्यक्ती मृत्यू झालेल्या दुकानदाराच्या संबंधातील असल्याचे समोर आले आहे. तर अन्य नऊ व्यक्ती त्याच भागातील म्हणजे तेलंगी पाच्छा पेठे येथे राहणाऱ्या आहेत.

नर्सच्या घरात २० जण राहतात

दहापैकी एक रूग्ण मृत व्यक्तीच्या तर अन्य सर्व नऊ व्यक्ती खासगी रूग्णालयातील करोनाबाधित महिला कर्यचाऱ्याच्या संबंधातील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे करोनाबाधित महिलेच्या घरात एकूण २० जण राहतात.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown: आडमुठ्या पोलिसांमुळे आजारी बापाला खांद्यावर घेऊन मुलाला पायी जावं लागलं


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -