घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: सप्टेंबरपर्यंत कोरोनाची लस येणार, ब्रिटनच्या वैज्ञानिकांचा दावा!

CoronaVirus: सप्टेंबरपर्यंत कोरोनाची लस येणार, ब्रिटनच्या वैज्ञानिकांचा दावा!

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आतापर्यंत जगात २१ लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोनावर काही देशात लस संशोधन केले जात आहे. जगात सर्वाधिक कोरोना बाधितांच्या यादीत ब्रिटनचा देखील समावेश आहे. ब्रिटनमध्ये वैज्ञानिक कोरोनावर उपचार करिता संशोधन करत आहे.

ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठमधील लससंशोधन विभागाच्या प्राध्यापिका सारा गिलबर्ट यांनी कोरोना विषाणूची लस बनवत असल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी पत्रकारांसोबत बोलताना गिलबर्ट यांनी असा दावा की, कोरोनाची लस सप्टेंबरपर्यंत येणार आहे. सध्या कोरोना विषाणूवर आम्ही काम करत आहोत. ज्याला आम्ही एक्स नाव दिलं आहे. यासाठी आम्हाला योजना आखून काम करण्याची गरज आहे.

- Advertisement -

त्या म्हणाल्या की, ChAdOx1 या तंत्रज्ञानाद्वारे १२ चाचण्या करण्यात आल्या आहे. आम्हाला एका डोसपासून प्रतिकारशक्तीबद्दल चांगले परिणाम मिळाले. तर आरएनए आणि डीएनएन द्वारे दोन किंवा अधिक डोस आवश्यक आहे. प्रोफेसर गिलबर्ट यांनी लसची क्लिनिकल चाचणी सुरू झाल्याची माहिती दिली. तसंच विश्वास व्यत केला की, यावर्षी सप्टेंबरपर्यंत दहा लाख लस उपलब्ध होतील.

ऑक्सफर्ड विद्यापीठच्या टीमला इतका आत्मविश्वास आहे की, त्यांनी क्लिनिकल चाचण्यापूर्वीच लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. यासंदर्भात प्राध्यापक अॅड्रियन हिल म्हणाले की, टीममध्ये आत्मविश्वास आहे. क्लिनिकल चाचणी पूर्ण झाल्यावर त्यांना सप्टेंबरपर्यंत थांबण्याची इच्छा नाही आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. जगातील विविध भागात सात उत्पादकांसह उत्पादन केलं जात आहे.

- Advertisement -

या सात उत्पादकांमध्ये तीन ब्रिटन, दोन युरोप आणि प्रत्येक एक भारत आणि चीन आहे. जास्तीत जास्त वर्षासाठी या लसीचे दहा लाख डोस सप्टेंबरच्या अखेरीस उपलब्ध होतील अशी अशा व्यक्त केली आहे. तीन टप्प्यातील चाचणी ५१० स्वयंसेवकांसह सुरू झाली असून तिसऱ्या टप्प्यात ५ हजार स्वयंसेकांची भरती होणे अपेक्षित आहे, असं अॅड्रियन म्हणाले. प्राध्यापक गिलबर्टच्या टीमला युकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च आणि द युकी रिसर्च अॅण्ड इनोव्हेशनने २.२ कोटी डॉलर्सचे निधी दिला आहे.


हेही वाचा – VIDEO: घरी राहण्याचे आवाहन करणारा पोलीस कॉन्स्टेबलच बनला ‘यमराज’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -