घरदेश-विदेशVIDEO: घरी राहण्याचे आवाहन करणारा पोलीस कॉन्स्टेबलच बनला 'यमराज'!

VIDEO: घरी राहण्याचे आवाहन करणारा पोलीस कॉन्स्टेबलच बनला ‘यमराज’!

Subscribe

मध्य प्रदेशातील पोलीस अधिकारी यमराज बनून नागरिकांचे प्रबोधन करत आहे.

भारतात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाकडून आपापल्या परिने प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडून नागरिक शासनाने बनवलेले हे नियम पायदळी तुडवताना दिसताय. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलीसांकडून भन्नाट शिक्षा करण्यात येत आहे. नियम मोडणाऱ्या लोकांसाठी पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या रुपात येऊन त्यांना समज देतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील इंदूरच्या एमजी रोड येथील कॉन्स्टेबल पोलीस जवाहर सिंह यांनी यमराजाची वेशभूषा परिधान करून लोकांना घरीच रहाण्याचे आवाहन केले आहे. हा कॉन्स्टेबल पोलीस यमराज बनून आला असून तो नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

असा आहे हा व्हिडीओ

मध्य प्रदेशमधील शहरांमध्ये पोलिसांच्या गाडीवर एक यमराज पाहायला मिळत आहे. हा यमराज जनतेला कोरोनामुळे मरणाची भीती दाखवत असून कोरोनाचे संकट असताना अनेकजण विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. वारंवार शिक्षा करुनही ही टारगट मंडळी ऐकत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलीस विविध क्लृप्त्या करत ही लोकं घरात कसे राहतील याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात काही पोलिसाने कविता, गाणी गाऊन जनजागृती केली होती. आता मध्य प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल यमराज बनून नागरिकांचे प्रबोधन करत आहे.

राज्यात आतापर्यंत १३१० लोकांना कोरोनाची लागण झाली असून सर्वात जास्त ८४२ रूग्ण इंदूरमध्ये आहेत. राज्यात कोरोना संक्रमणामुळे ६९ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ५२ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा संसर्ग पसरला आहे.


TikTok व्हिडीओला लाईक मिळाले नाही; नैराश्यातून तरूणाचं टोकाचं पाऊल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -