घरट्रेंडिंगCoronavirus: गुगलने डूडल साकारत कोरोना वॉरियर्सचे मानले आभार!

Coronavirus: गुगलने डूडल साकारत कोरोना वॉरियर्सचे मानले आभार!

Subscribe

लॉकडाऊनमध्ये गुगलने देखील सेवा पुरवत असलेल्या कोरोना वॉरियर्सचे आभार मानले

कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस वाढणारा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक लोकं प्रयत्न करत आहे. कोरोनाविरोधातील युद्धात सर्वच क्षेत्रातील मंडळी पुढे सरसावत असून आपल्या परीने सहकार्य करत आहे. कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गुगलने देखील सेवा पुरवत असलेल्या कोरोना वॉरियर्सचे आभार मानले असून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दररोज गुगल डूडल्सची एक विशेष सीरिज तयार करत आहे, या सीरिजच्या माध्यमातून ते या गंभीर परिस्थितीत देखील लोकांना मदत करणार्‍या लोकांचा सन्मान करत आहेत.

डूडलच्या माध्यमातून दिले धन्यवाद

या विशेष डूडलमध्ये गुगलने अन्नाचा पुरवठा करणारे कामगार, पॅकिंग आणि शिपिंग कामगार, सार्वजनिक वाहतूकदार, किराणा कामगार, शिक्षक, सफाई कामगारांचे आभार मानले आहेत. गुगलने या सर्वांचे डूडलच्या माध्यमातून या सर्वाना धन्यवाद दिले आहे.

- Advertisement -

वॉरियर्सचा डूडल बनवून गौरव 

आतापर्यंत गुगल वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांच्या सन्मानार्थ डूडल साकारले आहे, तसेच आज गुगलने एकत्रितपणे डूडल बनवून या सर्व लोकांचा गौरव केला आहे. कोरोना व्हायरस संदर्भातील काही विशेष डूडल गुगलने साकारले होते. यापूर्वी, गुगलने शिक्षक, अन्न सेवा कामगार, लोकांना सामान पुरवित असलेल्या पॅकेजिंग, शिपिंग आणि वितरण कामगारांप्रती आदर व्यक्त केला होता. यासह कोरोना व्हायरचा सामना करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांचे वेगवेगळे विशेष डुडल साकारून आभार मानले आहे.


राखी सावंतने शेअर केला नवऱ्यासह लग्नातला फोटो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -