घरताज्या घडामोडीमालेगाव रुग्णालयात रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा राडा

मालेगाव रुग्णालयात रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा राडा

Subscribe

मालेगाव सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल झालेला रुग्ण रविवारी (दि.19) दुपारी 3.30 वाजेदरम्यान दगावला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्ण दगावल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावमय वातावरण निर्माण झाले होते. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. रुग्णालयात कोणत्याही प्रकारची तोडफोड झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असले तरी अतिदक्षता कक्षात ऑक्सिजन सिलेंडर आदळण्यात आल्याचे उघकीस आले आहे.

माळेगावातील इस्लामपूर भागातील 45 वर्षीय रुग्णास रविवारी दुपारी श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रुग्णात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्याची हालचाली सुरू होत्या. तितक्यात रुग्णाचा मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला. एकाने अतिदक्षता विभागात क्सिजन सिलेंडर आदल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला. पोलीस अपर अधीक्षक रत्नाकर नवले यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. पोलीस अपर अधीक्षक नवले यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सुरक्षेसाठी पोलीस तैनात केले जातील, असे सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत कामकाज सुरू केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -