घरCORONA UPDATEप्रसूतीसाठी हॉस्पिटल मिळेना, गर्भवती महिलेची ५ किमी पायपीट! अखेर...

प्रसूतीसाठी हॉस्पिटल मिळेना, गर्भवती महिलेची ५ किमी पायपीट! अखेर…

Subscribe

प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर ही महिला आपल्या पतीसह घाराबाहेर पडली. मात्र तीला कुठेच दवाखाना मिळाला नाही.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याचा परिणाम सामाजिक, आर्थिक स्तरावर आणि वैयक्तिक आयुष्यावरही होताना दिसत आहे. अशीच एक घटना बंगळुरमध्ये घडली आहे. बंगळुरमध्ये एका गरोदर महिलेने मुलाला जन्मदेण्यासाठी पायी ५ किलोमीटरचा प्रवास केला. प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर ही महिला आपल्या पतीसह घाराबाहेर पडली. मात्र तीला कुठेच दवाखाना मिळाला नाही. अखेर एका डेन्टिस्टच्या दावाखान्यात तीने मुलाला जन्म दिला. १४ एप्रिलला एका डॉक्टर दाम्पत्याने महिलेची प्रसुती करत बाळ आणि आईला सुखरूप वाचवले.

- Advertisement -

‘ते साधारण ९च्या सुमारास दावखान्यात पोहचले. खरतर मे ची तारीख या महिलेला देण्यात आली होती. मात्र या आधीच महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. ते डॉक्टर शोधतच आमच्यापर्यंत पोहचले. हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्या महिलेने बाथरूमला जाण्यासाठी विचारणा केली. पण बाथरूम वरच्या मजल्यावर असल्यामुळे तीला वर जाणं शक्य नव्हतं. अखेर बाजूला असलेल्या रिकाम्या खोलीत तीने बाळाला जन्म दिला अशी माहिती डॉक्टर रमय्यांनी दिली.

पुढे त्या म्हणाल्या की, बाळाच्या जन्मानंतर आम्हाला वाटले की, बाळाचा मृत्यू झाला आहे. कारण बाळाचा श्वास सुरू नव्हता आणि त्या महिलेलाही मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. माझे पती  सर्जन आहेत. मी त्यांना बोलवले. पण त्यांच्याकडे दंत सर्जरी व्यतिरिक्त कोणतीच साधनं नव्हती. अखेर आम्ही रक्तस्त्रावार नियंत्रण मिळवले. बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या नाकात घाण असल्याचे लक्षात आले ती काढून टाकल्यावर डॉक्टरांनी तोंडावाटे त्याला श्वास दिला. अखेर बाळाने श्वास घ्यायला सुरूवात केली.

- Advertisement -

या दोघा दाम्पत्याकडे पैसे नव्हते. त्यांना कन्नडमध्ये बोलताही येत नव्हते. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉ. रम्या म्हणाल्या की, तिने रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना केसी जनरल रुग्णालयात नेले. सध्या,  आई आणि बाळ दोघेही केसी जनरल रुग्णालयात आहेत.


हे ही वाचा – उत्तरप्रदेशात पावसाचं थैमान, वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात १६ जणांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -