घरताज्या घडामोडीजन्माला येण्यापूर्वी बाळाची सोशल मीडियावर विक्री!

जन्माला येण्यापूर्वी बाळाची सोशल मीडियावर विक्री!

Subscribe

संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपयायोजना करत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे सध्या राज्यात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र दुसरीकडे याचदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. औरंगाबादमध्ये जन्माला येण्यापूर्वीच मेहुण्याच्या पोटातील बाळाची सोशल मीडियावर विक्री होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पोटातील बाळाची विक्री दत्तक देण्याच्या नावाखाली होत होती. तसंच पैशांची मागणी केली जात होती. याप्रकरणी विक्री करणाऱ्या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडले?

निकिता खडसे आणि शिवशंकर तांगडे यांनी पोटातील बाळाची जन्माला येण्यापूर्वी विक्रीबाबतची फेसबुकवर पोस्ट टाकली होती. शिवशंकर यांची मेहुणी सात महिन्यांची गरोदर आहे. तिला नवऱ्याने सोडले असून तिला दुसरे लग्न करायचे आहे. म्हणून तिला बाळाला जन्म दिला नंतर बाळाची विक्री करायची आहे, अशी महिती देण्यात आली.

- Advertisement -

त्यांनी याबद्दल्यात पैशांचीही मागणी केली होती. या पोस्टद्वारे त्यांनी पीपल अॅडॉप्शन ग्रपुमधून दत्तक मूल घेणाऱ्यांची यादी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी यादी व्यक्तींशी संपर्क करून आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा केली. यासर्व प्रकारनंतर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी निकिता खडसे आणि शिवशंकर तांगडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोना हे आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं अदृश्य युद्ध! – राजनाथ सिंह

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -