घरCORONA UPDATEनेटकऱ्यांनी केले दीपिकाला लक्ष्य; म्हणाले, या व्यक्तीसोबत चर्चा नको

नेटकऱ्यांनी केले दीपिकाला लक्ष्य; म्हणाले, या व्यक्तीसोबत चर्चा नको

Subscribe

बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण जागतिक आरोग्य संघटनेच्या चर्चासत्रात सहभागी होत आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या नेटकऱ्यांच्या टीकेला पत्र ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे प्रमुख ट्रेड्रोस एॅधानॉम घेबरेयेसस यांच्यासोबत २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मानसिक आरोग्य या विषयावरील चर्चासत्रात दीपिका पदुकोण सहभागी होणार आहे. तशी माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. मात्र मुद्द्यावर नेटकरी संतापले असून त्यांनी सोशल मीडियावरच दीपिकाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

काय म्हणताहेत नेटकरी

दीपिका पदुकोणने यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की, तिला मानसिक तणावातून जावं लागलं असून त्यातून ती कशी सावरली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लोकांसमोर मानसिक स्वास्थ्य या विषयासंबंधी जागृकता निर्माण करण्यासाठी दीपिका जागतिक आरोग्य संघटनेच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत आहे. या निमित्ताने दीपिका आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय मांडत आहे. मात्र काही नेटकऱ्यांना तिची ही भूमिका पटलेली नसून त्यांनी उघडपणे याचा विरोध केला आहेत. नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, ज्या संघटनेच्या प्रमुखाने चीनला पाठिशी घातले आहे, त्यांच्याशी निगडीत माहिती का देता. यावर नेटकरी संतापले.

- Advertisement -

 

- Advertisement -

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांवर वारंवार चीनला पाठिशी घालण्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेचे प्रमुख चीनला पाठिशी घालत असून आमचे सर्व म्हणणे डावलत असल्याचे यापूर्वी म्हणाले आहेत. तसेच अमेरिकेने याचा राग मनात ठेवत जागतिक आरोग्य संघटनेला दिली जाणारी मदतही थांबवली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रमुखांवरील राग हा जगजाहीर आहे. चीनमुळे कोरोना विषाणू जगभर पसरला असून अशा देशाचे समर्थन करणाऱ्याचा विरोध आता नेटकरीही करत आहेत.

हेही वाचा –

एप्रिलचे वेतन तरी पूर्ण मिळणार का? शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -