घरताज्या घडामोडीLockDown: लठ्ठपणा कमी करायचाय तर घरातील ही कामं करा

LockDown: लठ्ठपणा कमी करायचाय तर घरातील ही कामं करा

Subscribe

जगावर सध्या कोरोनाच संकट आहे. या कोरोना संकटावर मात करण्यासाठी अनेक देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे घरात बसून लठ्ठपणाची समस्या होण्याची जास्त शक्यता असते. पण सतत व्यायाम किंवा योगा केल्यामुळे लठ्ठपणाची समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र अनेक वेळा आपल्याला घरातील कामं केल्यामुळे देखील लठ्ठपणा कमी होतो असं सांगितलं जात. सध्या सगळेजण घरी असल्यामुळे घरातमधली कामं करत आहेत. पण घरातल्या नक्की कोणत्या कामामुळे लठ्ठपणा कमी होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बाथरूमशी संबंधित असलेली छोटी कामे ही आपला लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. बाथरूमी मधील फरशी, बेसिन साफ करतात आपल्या शरीरातील कॅलरीज कमी होतात. बाथरूम साफ करणे हा देखील एक प्रकारचा व्यायामच आहे. सफाई करताना हात, पाय आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

- Advertisement -

बाथरूमीमधील बॅक्टेरिया एक आठवडा जिवंत राहू शकतात. त्यामुळे बाथरुममधील फरशी दररोज साफ करा. जर तुम्ही खाली बसून फरशी साफ करत असला तर तुमच्या शरीरातील प्रत्येक तासाला २४० कॅलरीज बर्न होऊ शकतात. याशिवाय कमरेची चरबी देखील कमी होऊ शकते. बाथरूममधील इतर गोष्टी देखील साफ करणे महत्त्वाचे असते.

बाथरुममधील साफसफाई करणे केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मते, स्वच्छ बाथरूम पाहून आपले मन चिंतामुक्त होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -