घरताज्या घडामोडीCoronaVirus: वायू प्रदूषणाच्या कणांवर आढळले कोरोना विषाणू!

CoronaVirus: वायू प्रदूषणाच्या कणांवर आढळले कोरोना विषाणू!

Subscribe

वैज्ञानिकांना वायू प्रदूषणाच्या कणांवर कोरोना विषाणूचा असल्याचा शोध लागला आहे. वैज्ञानिक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे की, वायू प्रदूषणातून दूर पर्यंत जाण्यासाठी विषाणू सक्षण आहे का? आणि संक्रमित लोकांची संख्या वाढवण्याची शक्यता असू शकते का? संशोधन अजून सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. वायू प्रदूषणाच्या कणांवर किती काळ विषाणू जिवंत राहून शकतो हे अद्याप समजू शकलेले नाही.

इटलीमधील वैज्ञानिक बर्गमो येथील एक शहात आणि एक औद्योगिक स्थळावरील बाहेरी वायू प्रदूषणाचे नमुने गोळा करण्यासाठी प्रामणित तंत्राचा वापर केला. काही नमुन्यांमध्ये कोविड-१९चे विशिष्ट नमुने आढळले आहेत. एका स्वतंत्र प्रयोगशाळेत चाचणी करून कणांवर कोविड-१९ असल्याची ओळख पटवली आहे.

- Advertisement -

या संशोधनाचे नेतृत्व करणारे इटलीच्या बोलोग्ना विद्यापीठच्या लिओनार्डो सेट्टी म्हणाले की, वायू प्रदूषणामुळे कोरोनाचे अधिक प्रमाणात संक्रमण होऊ शकते की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. दोन संशोधन गटांनी वायू प्रदूषणाचे कण कोरोना व्हायरस हवेत पसरण्यास मदत करतात, याचा शोध लावला आहे.

सेट्टीच्या टीमद्वारे सांख्यिकीय विश्लेषाणावरून असे समोर आले आहे की इटलीतील काही भागात जिथे जास्त प्रदूषण आहे तिथे संक्रमितांची संख्या जास्त असल्याचे म्हटले जात आहे. हा प्रदेश युरोपमधील सर्वात जास्त प्रदूषित प्रदेशांपैकी एक आहे. सेट्टीच्या टीमने केलेल्या या कोणत्याही अभ्यासाचा आढवा घेतला नाही. त्यामुळे स्वतंत्र वैज्ञानिकांना याला समर्थन दिले नाही. परंतु अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, त्यांचा शोध कौतुकास्पद आहे आणि तपासणीची आवश्यकता आहे.

- Advertisement -

वायू प्रदुषणामार्फत कोरोना विषाणू कसा पसरतो?

बाधित लोकांंनी खोकले आणि शिंकल्यामुळे विषाणू भरलेले थेंब दोन किलो मीटरच्या आत जमिनीवर पडतात. परंतु छोटे थेंब हवेत काही मिनिटांपासून ते तासासाठी राहू शकतात आणि त्यामुळे विषाणूचा प्रसार होतो.


हेही वाचा – LockDown: कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमला पसंती, सोयीस्कर असल्याने खर्चाची बचत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -