घरताज्या घडामोडीLockDown: कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमला पसंती, सोयीस्कर असल्याने खर्चाची बचत

LockDown: कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमला पसंती, सोयीस्कर असल्याने खर्चाची बचत

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला. तसंच त्यावेळेस सर्व खासगी आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या. आता लॉकडाऊनच्या एका महिन्यानंतर वर्क फ्रॉम होम हा बदल चांगला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त लोकांना घरातून काम सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत देशातील १८० अब्ज डॉलर्सच्या आयटी कंपनींना व्यवसायात सातत्य निश्चित ठेवणे हे आव्हानात्मक होते. परंतु आज एका महिन्यानंतर कंपनीतील अधिकारी याकडे एक संधी म्हणून पाहता आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, घरातून कामाकरून उत्पन्नात झालेला खर्च आणि उत्पादकताचा नफा केवळ आयटी क्षेत्रातील कंपन्यांना होणार नाही. भविष्यात बँकांसह सेवा क्षेत्रातील विविध कंपन्यांमधील कार्यालयातून काम करण्याची संख्या कमी होईल.

- Advertisement -

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)चे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी स्पष्ट करताना म्हटले आहे की, अनेक दशकांपासून आयटी कंपन्यांचे मॉडेल असे होते की, ज्यामध्ये एका रुममध्ये बसून अनेक कर्मचारी काम करत बसायचे. परंतु लॉकडाऊन नंतर वर्क फ्रॉम होममुळे हे बदलून गेले.

डब्ल्यएनएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नॅसकॉमचे माजी अध्यक्ष केशव मुरुगेश म्हणाले की, या आव्हानात संस्थेने वेगाने काम केले. २५ लाख डेस्कटॉप आपल्या कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे काम सुरळीत सुरू आहे. वर्क फ्रॉम होम सुरू केल्यामुळे कंपन्यांना खर्च आणि कार्यक्षमतेच्या असलेले फायदे दिसू लागले. पुढे ते म्हणाले की, सध्या काम चांगल्या प्रकारे होत आहे. अशा प्रकारे दीर्घकाळ काम सुरू राहिले तर खूप चांगला परिणाम होईल.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: पत्ते खेळायला एकत्र जमलेल्या २४ जणांना झाली कोरोनाची लागण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -