घरताज्या घडामोडीचार महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवले

चार महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवले

Subscribe

एका चार महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाने विळखा अधिकच घट्ट केला आहे. मात्र, असे असताना देखील अनेक जण कोरोनावर मात करत आहेत. अशाच एका ४ महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात करत कोरोनाला हरवले आहे. या बालकासह ९ वर्षाची बालिका आणि सात जण कोरोनातून बरे झाले आहेत. या नऊ जणांना ससून रुग्णालातून आज घरी सोडण्यात आले आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालयात या ४ महिन्याच्या बाळाला १३ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर गेल्या १४ दिवसांपासून उपचार सुरु होते. सुदैवाने या बाळाला कोणताही आजार नव्हता. त्यानंतर त्याची आज चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.

- Advertisement -

त्यासोबतच आणखी एका ९ वर्षाच्या भवानी पेठेत राहणाऱ्या बालिकेला १० एप्रिलला दाखल केले होते. तिलाही आज घरी सोडण्यात आले. तसेच शुक्रवार पेठेतील ५५ वर्षीय पुरुष, गंजपेठेतील ६० वर्षीय पुरुष आणि इतर ५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.


हेही वाचा – रानडुक्करांच्या हल्ल्यात एक ठार; दोन जखमी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -