घरट्रेंडिंगपठाणांच्या घरी जन्म घेतलेला इरफान होता 'ब्राम्हण'!

पठाणांच्या घरी जन्म घेतलेला इरफान होता ‘ब्राम्हण’!

Subscribe

इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 मध्ये जयपूर येथे झाला होता. एका मुस्लिम पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानचं पूर्ण नाव शाहबजादे इरफान अली खान असं आहे.  त्यांच्या आई राजघराण्यातील होत्या. परंतू इरफान हा पठाणांच्या घरात जन्मलेला ब्राम्हण आहे असे त्याचे वडिल म्हणायचे.

इरफान खान यांचे वडिल जागिरदार खान यांना शिकारीची खूप आवड होती. ते नेहमी इरफानला घेऊन जायचे. शिकारीला जाता इरफानही फार उत्सुक असायचा. त्याला जंगल बघायला फार आवडायचे. पण प्राण्याला मारलेले इरफानला आवडत नसे. एखाद्या प्राण्याला मारल्यावर त्याच्या मुला बाळांचे काय होईल. असे प्रश्न तो आपल्या वडिलांना विचारत असे.  एकदा वडिलांनी इरफानच्या हातात बंदूक दिली. आणि एका प्राण्याची शिकार केली. तेव्हा इरफानला खूप वाईट वाटले. त्यामुळे इरफानचे वडिल नेहमी म्हणायचे, इरफान म्हणजे पठाणांच्या घरी जन्मलेला ब्राम्हण.

- Advertisement -

टेलिव्हिजन क्षेत्रापासून करिअरची सुरवात करणारे अभिनेते इरफान खान यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली. इरफान खान यांनी मकबूल, लाइफ इन अ मेट्रो, रोग, स्लमडॉग मिलेनियर, हिंदी मीडियम यांसारखे एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांना दिले. हॉलिवूड चित्रपट ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर, द अमेजिंग स्पाइडर मॅनसह जुरासिक पार्कमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. इरफान यांना ‘पान सिंह तोमर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. आज इरफानने कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.


हे ही वाचा – “तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्‍हारी दुनिया में घुस जाऊंगा.” इरफानचे गाजलेले एकसे एक डायलॉग!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -