घरमुंबईआम्ही परप्रांतीय, शिकतोय मराठी शाळेत आणि तुम्ही?

आम्ही परप्रांतीय, शिकतोय मराठी शाळेत आणि तुम्ही?

Subscribe

मराठी भाषिक पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवून आपल्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाट धरली आहे. त्यामुळे अनेक मराठी शाळांमधील पटसंख्या खालावली. काही शाळा तर बंद पडल्या. मराठी शाळांवर अशी बिकट परिस्थिती ओढवलेली असताना अमराठी परप्रांतीय पालक त्यांना नवसंजीवनी देत आहेत.

मराठी भाषिक पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवून आपल्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाट धरली आहे. त्यामुळे अनेक मराठी शाळांमधील पटसंख्या खालावली. काही शाळा तर बंद पडल्या. मराठी शाळांवर अशी बिकट परिस्थिती ओढवलेली असताना अमराठी परप्रांतीय पालक त्यांना नवसंजीवनी देत आहेत. कांजूरमार्गमधील वैभव विद्यालय या मराठी शाळेत तब्बल ६४ अमराठी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत, म्हणून गळा काढणार्‍या मराठी लोकांना या अमराठी लोकांनी धडा शिकवला आहे, असेच म्हणावे लागेल.

विक्रोळीतील कन्नमवार नगरातील विकास हायस्कूल या प्राथमिक मराठी शाळेत १० इतर भाषिक मुले शिकत आहेत. कन्नमवारनगर ही मराठी भाषिक वसाहत समजली जाते. तरीही येथे मराठी शाळांवर बंद पडण्याची टांगती तलवार आहे. कांजूरमार्ग आणि विक्रोळीमधील वैभव विद्यालय आणि विकास हायस्कूल या मराठी शाळांमध्ये इतर भाषिक मुले शिकत आहेत. मराठी भाषेच्या शाळेमध्ये शिकल्यामुळे आपण स्पर्धेत मागे पडतो, हा समज त्यांनी खोटा ठरवला आहे. कर्वेनगर येथील वैभव विद्यालयात इतर भाषिक विद्यार्थ्यांची संख्या २०१८-२०१९ च्या पटसंख्येनुसार २५ टक्के आहे.

- Advertisement -

या विद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्या २७५ आहे. त्यातील छोटा शिशू ते दहावीपर्यंत ६४ अमराठी विद्यार्थी आहेत. यात हिंदी, तमिळ, गुजराती, तेलगू, कन्नड, बंगाली मातृभाषा असणारे आहेत. दुसरीकडे विक्रोळीतील विकास हायस्कूलच्या प्राथमिक विभागामध्येही इतर भाषिक मुलांचा भरणा आहे. यावर्षी या शाळेत १० विद्यार्थी हिंदी भाषिक आहेत.

या शाळेत अभ्यासाबरोबर चांगली शिस्त लावण्यात येते. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकलेच पाहिजे. मराठी शाळेत असूनही आम्हाला इंग्लिश उच्च दर्जाचे शिकवले जाते. माझी आई कारखान्यात तर वडील वाहनचालक आहेत. माझा शिक्षणाचा खर्च शाळा उचलत असल्यामुळे त्यांच्यावर माझ्या शिक्षणाचा कोणताही भार येत नाही. माझी प्रगती पाहून माझ्या लहान भावलाही याच शाळेत घातले आहे. – अरिफा शेख, सातवी, वैभव विद्यालय

- Advertisement -

माझी भाषा तेलगू आहे, मला हिंदी समजत नसल्यामुळे माझ्या घरच्यांनी मला मराठी माध्यमात घातले. या शाळेत मला खूप काही शिकायला मिळाले. मी स्वतःला भाग्यवान समजते की, मला मराठी शाळेत शिकण्यास मिळाले. मराठी भाषेत शिक्षण घेऊनही भविष्य उज्ज्वल होऊ शकते. मेहनत केली तर आपण कोणत्याही हुद्यावर पोहचू शकतो. त्यात तुम्ही कोणत्या माध्यमात शिकलात यामुळे काहीही फरक पडत नाही.
– निर्मला रेनिकुंतला, दहावी, वैभव विद्यालय

मराठी शाळेत गेला आणि वाया गेला असे काही नाही. इतर भाषिक मुले आज मराठी शाळेत शिकतात याचा आनंद आहे, पण मराठी माणसांनीच या शाळांकडे पाठ फिरवली याचे दुःख आहे. मराठी शाळा जगवण्यासाठी राज्य सरकाने पावले उचलेली पाहिजेत. आमच्या शाळेत अनेक गोष्टी शिकवल्या जातात. इंग्लिश माध्यमांचा स्पर्धेत आम्ही कुठेही मागे नाही.
– बाळासाहेब हांडे, संस्थाचालक, वैभव विद्यालय

मराठी शाळेत खूप चांगले शिकवतात, असे मला माझ्या शेजार्‍यांनी सांगितले होते. मराठी शाळेत माझ्या मुलांवर चांगले संस्कार झाले आहेत. विद्या कोणत्याही भाषेत असो ती विद्याच असते. मुले जर हुशार असतील तर प्रगती होणारच – श्रीधर रेनिकुंतला, पालक

आता मराठी शाळेमध्येही शैक्षणिक बदल घडत आहे. इंग्लिश चांगले शिकवले जाते. मराठी माध्यमात शिकूनही चांगला विद्यार्थी घडू शकतो. पालकांची मानसिकता बदलत आहे. आमच्या शाळा या फक्त मातृभाषा नाही तर मराठी संस्कृतीही शिकवतात. आम्ही इंग्लिश स्पिकिंग, गणित विषयही प्राथमिकपासून इंग्लिशमध्ये शिकवतो.
– दर्शना कर्णूक, मुख्याध्यापिका, विकास हायस्कूल, प्राथमिक विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -