घरमुंबई२८ जुलैला डॉक्टरांचा देशव्यापी संप

२८ जुलैला डॉक्टरांचा देशव्यापी संप

Subscribe

केंद्र सरकारच्या नॅशनल कमिशन बिलाला डॉक्टरांचा विरोध

येत्या २८ जुलैला म्हणजेच शनिवारी देशभरातील डॉक्टर संपावर जाणार आहेत. नॅशनल कमिशन विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या विधेयकाविरोधात डॉक्टर लढा देत आहेत. पण, कुठलाच ठोस निर्णय न घेतल्यामुळे डॉक्टरांनी थेट संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसंच, हे विधेयक संसदेत चर्चेसाठी मांडण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने याविरोधात देशभरातील डॉक्टर आता संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

शनिवारी संपाची हाक
वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता यावी यासाठी मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया (एमसीआय) बरखास्त करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजेच (एनएमसी) आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. पण, या विधेयकाला डॉक्टरांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी, २८ जुलैला देशभरातील डॉक्टर संपावर जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल काऊंसिलचे सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी दिली आहे. या संपात देशभरातील ३ लाखांहून अधिक डॉक्टर सहभागी होतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

या कारणांमुळे विरोध
मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियामध्ये (एमसीआय) ८० टक्के सदस्य हे निवडून येतात. तर २० टक्के सदस्यांची नियुक्ती केली जाते. पण, इथे ९० टक्के सदस्याची नियुक्ती करण्यात येणार असून १० टक्के सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता कशी येईल, असा सवाल इंडियन मेडिकल काऊंसिलने केला आहे.

याआधीही संपाची हाक 
हे विधेयक रद्द व्हावं म्हणून सहा महिन्यांपूर्वी ही डॉक्टर संपावर गेले होते. त्यावेळेस केंद्राने डॉक्टरांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. पण, त्यानंतर या सहा महिन्यात केंद्राने विधेयक रद्द करण्याबाबत काहीच निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे, आता डॉक्टर आक्रमक झाले असून त्यांनी या शनिवारी संप पुकारला आहे असं ही डॉ. संघवी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, आपत्कालीन सेवा वगळता संपूर्ण वैद्यकीय सेवा शनिवारी बंद असणार आहे, असं ही सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -