घरCORONA UPDATE'देशात कोरोनाच्या संख्येत वाढ होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार'

‘देशात कोरोनाच्या संख्येत वाढ होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार’

Subscribe

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातच या परिस्थीतीवर नियंत्रण मिळवलं असतं. तबलिगी जमातने गुन्हा केला असून त्याच पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे

तबलिगी जमातने कोरोनाचा फैलाव केला नसता तर लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असतं, असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मांडले. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार आहे. या लोकांनी कोरोना विषाणूंचे वाहक म्हणून काम केल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

खरतर देशात योग्यवेळी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातच या परिस्थीतीवर नियंत्रण मिळवलं असतं. तबलिगी जमातने गुन्हा केला असून त्याच पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असंही योगी आदित्यनाथ यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. यावेळी बोलनाता आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात तबलिगी जमातशी संबंधित तीन हजार लोक सापडले असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

आजार लपवणे हा गुन्हाच

आजार होणे हा गुन्हा नसला तरी आजार लपवणे हा गुन्हा आहे. ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच होणार. अशी माहिती योगी यांनी दिली.

उत्तर प्रदेशातील १९ जिल्हे रेड झोनमध्ये

उत्तर प्रदेशात आतापर्यंत कोरोनाचे २३२८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६५४ जणांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आलं आहे. तर एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील १९ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तर ३६ जिल्हे ऑरेंज झोन आणि २० जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -