घरताज्या घडामोडीपरिचारिका म्हणतात, सुविधांअभावी मालेगावात गैरसोय 

परिचारिका म्हणतात, सुविधांअभावी मालेगावात गैरसोय 

Subscribe

मध्यरात्री दोन वाजेपर्यंत परीचारिका रस्त्यावर

मालेगावात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील परिचारिकांना मालेगावात रुग्णसेवेसाठी पाठविले जात आहे. मात्र, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार शनिवारी (दि.2) मध्यरात्री उघडकीस आला आहे. जेवण व निवासाची सोय नसल्याने परिचारिकांना रात्री दोन वाजेपर्यंत उघड्यावरच थांबावे लागल्याने व वरिष्ठ अधिकारी दाद देत नसल्याने जिल्हा नर्सेस असोसिएशनने रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध केला.
   मालेगावात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मालेगावात 324 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर मालेगावात परिचारिकांना पाठविण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मध्यरात्री जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील 35 परिचारिकांना मालेगावात हजर होण्याबाबत ऑर्डर काढल्या. कर्तव्य टाळणाऱ्यावर कारवाई करावी, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिचारिका मालेगावला जाण्यासाठी शनिवारी दुपारी निघाल्या. मालेगावात आल्यावर त्यांना सुविधांसाठी संघर्ष करावा लागला. 

निवासाच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य

शनिवारी येणाऱ्या परिचारिकांसाठी निवाऱ्याची व्यवस्था मालेगावातील आदिवासी वसतिगृहात करण्यात आली होती. मात्र, हे वसतिगृह वर्षभर बंद असल्याने व साफसफाई केली नसल्याने घाणी साम्राज्य होते. अनेक बाथरूमचे दरवाजे तुटले होते, नळ गंजल्याने पाणीच येत नव्हते. विशेष म्हणजे या ठिकाणी पुरुष व महिला परिचारिकांना एकत्र राहण्यास सांगितले होते. 

ऑर्डर काढताना सुविधा पुरवाव्यात

मालेगावात परिचारिकांना पाठवल्याने रुग्णालयांवर ताण वाढत आहे. कंत्राटी पध्द्तीने परिचारिकांची भरती करावी. मालेगावात रुग्णसेवा करण्याची परिचारिकांची तयारी आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने परिचारिकांसाठी चांगल्या जेवण व निवाऱ्याची व्यवस्था करावी. ऑर्डर काढताना सुविधा पुरवण्यात याव्यात, असे जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पूजा पवार यांनी सांगितले. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -