घरCORONA UPDATEकायदा मंत्रालयातील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, शास्त्री भवनचा एक मजला सील

कायदा मंत्रालयातील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, शास्त्री भवनचा एक मजला सील

Subscribe

शास्त्री भवनमधील चौथ्या मजल्यावरील ‘ए’ विंग सील करण्यात आली आहे. अनेक गेट आणि लिफ्टही बुधवारपर्यंत बंद राहतील.

कायदा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याने शास्त्री भवनचा एक मजला सील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सरकारी इमारतीत अनेक मंत्रालयांची कार्यालये आहेत. लुटियन्स झोनमधील ही दुसरी सरकारी इमारत आहे, त्यातील एक भाग सील करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नीती आयोगाची इमारत सील करण्यात आली आहे. दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कायदा मंत्रालयाच्या एका अधिका्याला कोविड -१९ चा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या मंत्रालयाचे कार्यालय शास्त्री भवनच्या चौथ्या मजल्यावर आहे.

प्रोटोकॉलनुसार कोरोनाबाधीत अधिकाऱ्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की शास्त्री भवनमधील चौथ्या मजल्यावरील ‘ए’ विंग सील करण्यात आली आहे. अनेक गेट आणि लिफ्टही बुधवारपर्यंत बंद राहतील. नीती आयोगाच्या आधी राजीव गांधी भवनात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दोन प्रकरणं मिळाल्यानंतर या इमारतीला सील करण्यात आलं आहे. या इमारतीत नागरी उड्डाण मंत्रालय आहे. दरम्यान, सीआरपीएफ मुख्यालय आणि बीएसएफ मुख्यालयाचा काही भाग अलीकडेच सील करण्यात आला आहे. या इमारती देशाच्या राजधानीच्या सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – निगेटिव्ह टेस्टनंतरही मरकजच्या लोकांना डिस्चार्ज का नाही?; ओवैसींचा सवाल

- Advertisement -

देशात कोविड -१९ संक्रमित रुग्णांची संख्या ४६ हजारच्या वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,५७२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर संसर्ग झालेल्यांची संख्या, ४६,५४१ वर पोहोचली आहे. तथापि, आतापर्यंत १२,९१९ रूग्ण बरे झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -