घरताज्या घडामोडीसुपर फ्लॉवर मून २०२० : आज यावर्षीचा शेवटचा सुपरमून दिसणार!

सुपर फ्लॉवर मून २०२० : आज यावर्षीचा शेवटचा सुपरमून दिसणार!

Subscribe

सुपर फ्लॉवर मून भारतीय वेळेनुसार गुरुवारी ७ मे रोजी सायंकाळी ४.१५ वाजता त्यांच्या शिखरावर असेल आणि पूर्णपणे चमकदार दिसेल.

२०२० वर्षाचा शेवटचा सुपरमून (Supermoon) ७ मे रोजी दिसणार आहे. नासाच्या वेबसाईट अनुसार, सुपर फ्लॉवर मून भारतीय वेळेनुसार गुरुवारी ७ मे रोजी सायंकाळी ४.१५ वाजता त्यांच्या शिखरावर असेल आणि पूर्णपणे चमकदार दिसेल. परंतु भारतीय लोक या सुपर फ्लॉवर मूनला पाहू शकत नाही. कारण यावेळेला भारतात दुपार असणार आहे. मात्र, इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन सुपरमूनला पाहता येईल. ७ मे नंतर सुपर पिंक मून पुढील वर्षी २७ एप्रिल २०२१ रोजी पाहायला मिळेल. या सुपर फ्लॉवर मूनला कॉर्न फ्लाटिंग मून आणि फूल मिल्क मून या नावानेही ओळखला जातो.

नासाच्या वेबसाईट नुसार, सुपर फ्लॉवर मून पृथ्वीच्या खूपच जवळ असेल. सुपर फ्लॉवर मूनला लोक भारतात पाहू शकत नाही. कारण यावेळी भारतात दुपार असेल. मात्र, ही सुंदर खगोलीय घटना ऑनलाईन पाहता येणार आहे. याशिवाय मागे सुपर मून ७ एप्रिल २०२० रोजी दिसून आला होता. आणि याला सुपर पिंक मून म्हणून संबोधले गेले.

- Advertisement -

सुपर मून म्हणजे काय?

पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालताना एक वेळ अशी येते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. यावेळी चंद्र मोठा आणि चमकदार दिसतो. यालाच सुपर मून असे म्हणतात.

जवळपास पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर ३८४,४०० किलोमीटर असते. हे अंतर सुपर मून च्या वेळी काही प्रमाणात कमी होते. यावेळी पृथ्वी आणि चंद्र यांचे अंतर ३६१,१८४ किलोमीटर एवढे असते.

- Advertisement -

सुपरमूनच्यावेळी चंद्र रोजच्या तुलनेत १४ टक्के मोठा आणि ३० टक्के जास्त चमकदार दिसतो. याला फ्लॉवर मून नाव यासाठी दिले गेले आहे की, ही वेळ फुल बहरण्याची असते.

सुपर फ्लॉवर मून कसं बघाल

या वर्षाचे शेवटचे सुपरमून ७ मे रोजी सायंकाळी ४.१५ वाजता भारतात दिसेल. यावेळी उजेड असल्या कारणाने देशातील लोक आकाशात सुपर मून पाहू शकत नाही. मात्र, ऑनलाईन घरी बसून लाईव्ह बघू शकता.

सुपरमून नंतर चंद्र ग्रहण लागेल

सुपर मून नंतर ५ जून रोजी चंद्र ग्रहणाचा नजारा पाहू शकता. हे ग्रहण रात्री सुरू होईल. हे ग्रहण भारतात ही पाहायला मिळेल. तसेच २१ जून रोजी सूर्य ग्रहण ही लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -