घरCORONA UPDATEपुढील ९ महिन्यात भारतात २ कोटी तर जगात ११ कोटी बालकांचा जन्म...

पुढील ९ महिन्यात भारतात २ कोटी तर जगात ११ कोटी बालकांचा जन्म – युनिसेफ

Subscribe

अमेरिकेत ११ मार्च ते १६ डिसेंबर दरम्यान ३३ लाखाहून अधिक बालकांचा जन्म होऊ शकतो.

भारतात पुढील ९ महिन्यांत दोन कोटींपेक्षा अधिक मुलांचा जन्म होणार आहे असा दावा युनीसेफने केला आहे. तसेय या मुलांच्या जन्मानंतर वैद्यकीय प्रश्न निर्माण होतील अशी भीतीही युनीसेफने व्यक्त केली आहे.

लहान मुलांसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटनेने म्हटले की, भारतात पुढील ९ महिन्यात २.१ कोटी मुलांचा जन्म होणार आहे. पण या बाळांसाठी आणि मातांसाठी आरोग्यसंबंधित अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही धक्कादायक आकडेवारी केवळ भारतातच नाही तर जगातही ११ कोटीहून अधिक बालकांचा जन्म होऊ शकतो असा अंदाज युनीसेफने व्यक्त केला आहे. याचा फटका फक्त विकसनशील नव्हे तर विकसीत देशांनाही बसणार आहे. तर अमेरिकेत ११ मार्च ते १६ डिसेंबर दरम्यान ३३ लाखाहून अधिक बालकांचा जन्म होऊ शकतो. असे युनीसेफने म्हटले आहे.

- Advertisement -

अनेक देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा अभाव निर्माण होऊ शकतो. सगळ्यांपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहचतील याची शाश्वती देता येऊ शकत नाही. त्याचबरोबर कोरोनाच्या भितीमुळे बालकांना आणि मातांना हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी रूग्णालयात नेण्यासाठी घाबरतील असेही युनीसेफने म्हटले आहे.


हे ही वाचा – coronavirus – ‘लवकरच महायुद्ध होणार…’ अभिनेत्याचं वादग्रस्त ट्वीट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -