घरCORONA UPDATECoronavirus - 'लवकरच महायुद्ध होणार...' अभिनेत्याचं वादग्रस्त ट्वीट

Coronavirus – ‘लवकरच महायुद्ध होणार…’ अभिनेत्याचं वादग्रस्त ट्वीट

Subscribe

अशाताच बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने ‘मला असे वाटते की आता लवकरच महायुद्ध होणार आहे’ सोशल मीडियावर ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्यावर गेला आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकार सोशल मीडियाच्या माध्यामातून जनजागृतीचा संदेश देताना दिसत आहे. अनेक कलारांनी नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत.. तर कोणी पीएम, सीएम फंडात मदत केली आहे. कोणी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पैसा उभा केला आहे तर कोणी I For India या कार्यक्रमाच्या माध्यमातून पैसा उभा केला आहे.

- Advertisement -

अशाताच बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने ‘मला असे वाटते की आता लवकरच महायुद्ध होणार आहे’ सोशल मीडियावर ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मला नाही माहित का? पण मला असे वाटते की लवकरच महायुद्ध होणार आहे. जगाचा विनाश होणार आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कमाल आर खानची ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. अनेकवेळा कमाल खान ट्रोल केलं आहे. कमाल आर खान नेहमी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखला जातो. तो बऱ्याच वेळा बिनधास्तपणे त्याचे मत मांडत असतो. अनेकदा सामाजिक विषयांवर मत मांडल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -