घरCORONA UPDATEपॅरामिलिट्री फोर्समध्ये कोरोनाचा कहर, आतापर्यंत ७५० जणांना लागण

पॅरामिलिट्री फोर्समध्ये कोरोनाचा कहर, आतापर्यंत ७५० जणांना लागण

Subscribe

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाशी लढणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे.

चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा कहर दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देश लॉकडाऊन केला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी आणि डॉक्टर दिवसभर काम करत आहेत. असे असूनही, कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे.

या प्राणघातक विषाणूच्या चक्रात सुरक्षा कर्मचारीही येत आहेत. आतापर्यंत पॅरामिलिट्री फोर्स म्हणजेच निमलष्करी दलातील ७५० सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सीआरपीएफमध्ये आतापर्यंत एकूण २३६ सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे, तर बीएसएफमध्ये कोरोनाबाधित सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या २७६ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: देशात गेल्या २४ तासांत ३२७७ नवे रुग्ण; तर १२८ जणांचा मृत्यू


शिवाय, आयटीबीपीमध्ये (इंडो-तिबेट सीमा पोलिस) कोरोना विषाणूची १५६ प्रकरणे, सीआयएसएफमध्ये ६४ आणि एसएसबीमध्ये १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत बीएसएफमध्ये कोरोना विषाणूची १८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर आयटीबीपीमध्ये २४ तासांत ५६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्याचप्रमाणे, सीआयएसएफमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८ नवे रुग्ण आढळले.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या २४ तासांत सीआरपीएफमध्ये कोरोनाचा फक्त एक रुग्ण आढळला. सीआरपीएफसाठी ही दिलासादायक बातमी आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणूच्या रुग्णांचा ६२ हजाराच्या पार गेला आहे, तर २,१०९ लोक मरण पावले आहेत. तर आतापर्यंत १९ हजार ३५७ जण बरे झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -