घरमनोरंजनमोदींना २०१९ साली पुन्हा निवडून द्या - कंगना रणौत

मोदींना २०१९ साली पुन्हा निवडून द्या – कंगना रणौत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारीत चित्रीत करण्यात आलेल्या शॉर्टफिल्मच्या प्रीमिअरला शनिवारी कंगणा रणौतने हजेरी लावली. यावेळी कंगणाने पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळली. ती म्हणाली की, मोदी हे देशाला लाभलेले उत्तम पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांना अजून एक संधी द्यायला हवी.

नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर हटके विधाने करुन चर्चेत राहणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे. कंगना म्हणाली की, ‘नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य आणि चांगले उमेदवार आहेत. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांचाच विजय व्हायला हवा. आपल्या देशाची अवस्था ठिक नाही. या खडतर परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदींसारख्या सक्षम पंतप्रधानांची देशाला आवश्यकता आहे. देशाची परिस्थिती सुधारण्याकरता ५ वर्ष हा कमी कालावधी आहे. त्यामुळे त्यांना अजून एकदा संधी द्यायला हवी. शनिवारी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित शॉर्ट फिल्म ‘चलो जिते है’चा प्रीमिअर पार पडला. या प्रीमिअरला कंगणाने हजेरी लावली होती. यावेळी तिला मोदींबाबात काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तिने पंतप्रधान मोदींना २०१९ साली पुन्हा संधी द्यायला हवी, असे मत मांडले.

 

- Advertisement -

कंगणाची स्तुतिसुमने

कंगना म्हणाली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या पदावर आहेत, ते या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांमुळे नाही, तर ते स्वबळावर, स्वत:च्या मेहनतीमुळे या पदापर्यंत पोहोचले आहेत. ते देशाच्या हिताची विविध कामे करत आहेत. पुन्हा संधी द्या, अशी मागणी अभिनेत्री कंगनाने यावेळी केली आहे. कंगणाने यावेळी मोदींवर स्तुतिसुमने उधळली.

- Advertisement -

 

प्रीमियरला या मंडळींनी लावली हजेरी

चलो जिते है च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उद्योगपती मुकेश अंबानी, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच कंगनासोबतच अक्षय कुमार, आफताब शिवदासानी, रवी किशन, पूजा बेदी, गुलशन ग्रोव्हर, अनु मलिक यांसारखे बॉलिवूड कलाकारही हजर होते.

 

 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -