घरCORONA UPDATELockdown Effect - बॉलिवूडने चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी निवडला OTT प्लॅटफॉर्म!

Lockdown Effect – बॉलिवूडने चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी निवडला OTT प्लॅटफॉर्म!

Subscribe

गर्दी टाळायची असेल कदाचित चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ सिनेमा  १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे आता तुम्हाला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये जाऊन पैसे खर्च करून पाहायची गरज नाही. कारण ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटगृहात नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लॉकडाउनमुळे जगभरातील थिएटर बंद आहेत. त्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

सिनेमांचं चित्रीकरण पूर्णपणे थांबलं आहे. ज्या सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण झालं ते प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. अशात अनेक हॉलिवूडपटांनी डिजीटल माध्यमांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. शूजित सरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिताबो’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणारा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला आहे.

”गुलाबो सिताबो’ सिनेमा माझ्यासाठी फार खास आहे. या सिनेमातून मी शूजीत दासोबत पुन्हा एकदा काम करू शकलो. विकी डोनरनंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करत असल्याचा आनंद आहेच. याचबरोबर खूप दिवसांची इच्छा आणि स्वप्नही पुर्ण झालं कारण मी या चित्रपटात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. मला आशा आहे की लोकांना आमची केमिस्ट्री नक्की आवडेल.’

- Advertisement -

कपिल देव यांच्यावरचा रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ’83’, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मीबॉम्ब’, त्याबरोबरच नवाजुद्दिन सिद्दिकीची प्रमुख भूमिका असलेला ‘घुमकेतू’, वरूण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नंबर वन’ हे सिनेमेदेखील पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यावर आहेत. सिनेमागृहे हे गर्दी जमण्याचे प्रमुख ठिकाण आहे. ती गर्दी टाळायची असेल कदाचित हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा – Lockdown – ‘राणादा’मध्ये नाही तर पाठकबाईंचा जीव ‘या’ मध्ये रंगलाय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -