घरदेश-विदेशदिल्लीहून बंगळुरूला विमानाने एकटा पोहोचला ५ वर्षांचा चिमुरडा!

दिल्लीहून बंगळुरूला विमानाने एकटा पोहोचला ५ वर्षांचा चिमुरडा!

Subscribe

आजपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्याने ५ वर्षाचा मुलगा विहान देखील त्याच्या आईला तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच भेटला.

आजपासून देशांतर्गत विमान प्रवास सुरू झाला असून पाच वर्षांच्या चिमुरड्याची अनोखी कहाणी या प्रवासात समोर आली आहे. हे पाच वर्षांचा चिमुरडा एकटाच विमानाने दिल्लीहून बंगळुरला पोहोचला. हे आश्चर्यकारक वाटत असेल पण सत्य आहे. देशातील लॉकडाऊनमुळे देशांतर्गत विमान सेवा बंद होती आणि लोकांना लांबचा प्रवास करता आला नाही. मात्र आजपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्याने ५ वर्षाचा मुलगा विहान देखील त्याच्या आईला तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच भेटला.

- Advertisement -

तीन महिन्यांपासून दिल्लीत होता विहान

दिल्लीहून बंगळुरूच्या विमानात विहान एकटाच आला होता. विहान शर्माची आई मंजरी शर्मा यांनी सांगितले की, तिचा मुलगा गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या आजोबांसह दिल्लीत होता. लॉकडाऊनपूर्वी तो दिल्लीला गेला आणि नंतर तिथेच अडकून राहिला होता. विहान दिल्लीहून एकटाच बंगळुरूला आला होता आणि त्याची आई त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेण्यास आली होती. विहानला फ्लाइट स्टाफने आईकडे सुखरूप पोहोचवले. विहानच्या आईने सांगितले की, सावधानता लक्षात घेऊन मी मुलाला मिठी देखील मारली नाही.

देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन विमान दिल्लीहून कर्नाटक विमानतळावर दाखल झाले असून त्यापैकी एका विमानात हा चिमुरडा विहान बसून आला होता.


पश्चिम बंगाल-आंध्र प्रदेश वगळता संपूर्ण देशात हवाई सेवा सुरू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -