घरताज्या घडामोडीशेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक आला शेतकर्‍यासमोर अन...

शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक आला शेतकर्‍यासमोर अन…

Subscribe

वडगाव पिंगळा (सिन्नर) येथील माधवराव गंधास यांच्या घराला लागून असलेल्या आज (दि.२९) सकाळी शेडनेटमध्ये बिबट्या घुसल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकर्‍यासमोर भंबेरी उडाली. ही बाब वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.

शेडनेटमधील सिमला मिरचीला पाणी देण्यासाठी आज (दि.२९) रोजी सकाळी शेतमालक अरुण विंचू गेले असता अचानक बिबट्या त्यांच्या समोर आला. बिबट्या दिसताच त्यांची भितीने भंबेरी उडाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शेडनेटच्या बाहेर धाव घेत दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील यांना शेडमध्ये बिबट्या घुसल्याची माहिती दिली. पोलीस पाटीलांनी तत्काळ सिन्नर येथील वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना शेडमध्ये बिबट्या घुसल्याची माहिती दिली. शेडनेटचे गेट उघडे राहिल्याने बिबट्या आत गेला असावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -