घरताज्या घडामोडीKBC मध्ये १ करोड जिंकणारा विजेता बनला आयपीएस अधिकारी

KBC मध्ये १ करोड जिंकणारा विजेता बनला आयपीएस अधिकारी

Subscribe

१९ वर्षांपूर्वी एक १४ वर्षाचा तरुण आता आयपीएस अधिकारी बनला आहे.

कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक जण येऊन विजेते होऊन जातात. मात्र, त्यांची चर्चा तेवढ्यापूर्ती मर्यादित राहते. परंतु, सध्या एका ज्युनियर करोडपती विजेत्याची चर्चा सुरु आहे. या विजेत्यांनी २००१ मध्ये स्पेशल केबीसी ज्युनियर स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी १४ वर्षाचा असलेल्या रवी मोहन सैनी यांने सर्व १५ प्रश्नांची उत्तर देऊन १ कोटी रुपये जिंकले होते. या घटनेला आता २० वर्षे होत असून आज हाच रवी आयपीएस बनला आहे आणि त्याची पोस्टिंग गुजरात येथे करण्यात आली आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने अनेकांचे आयुष्य एका क्षणात बदलून टाकले आहे. यातीलच एक विजेता रवी मोहन सैनी या १४ वर्षाच्या मुलाचे लहानपणापासून आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. ते या मुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रवीने म. गांधी मेडिकल कॉलेज जयपूर येथून एमबीबीएस पदवी मिळविली आणि इंटर्नशिप सुरु असतानाच त्याची युपीएससीमध्ये निवड झाली आहे. तसेच त्याचे वडील देखील नेव्ही मध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे रवीने आयपीएसची निवड केली. दरम्यान, २०१४ मध्ये तो देशात ४६१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सध्या रवी पोरबंदर येथे कोविड साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेखोरपणे करण्यास प्राधान्य देत आहेत.

- Advertisement -

यावेळी करण्यात आली घोषणा

सध्या कौन बनेगा करोडपतीचा १२ वा सिझन सुरु असून अमिताभ बच्चन यांनी एका व्हिडीओमध्ये ही घोषणा केली आहे. केबीसीची सुरूवात २००० मध्ये झाली. सुरवातीची बक्षीस रक्कम १ कोटी होती. दुसऱ्या, तिसऱ्या सिझनमध्ये ती २ कोटी झाली चौथ्या सिझनमध्ये १ कोटी बक्षीस आणि ५ कोटीचा जॅकपॉट असे त्याचे स्वरूप बदलले. सिझन ९ मध्ये १६ प्रश्न आणि ७ कोटी बक्षीस, असे त्याचे स्वरूप होते.


हेही वाचा – नातेवाईक क्वारंटाईनमध्ये अडकल्याने अथवा पुढे येत नसल्याने रुग्णालयांत मृतदेह पडूनच!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -