घरताज्या घडामोडीखड्ड्यातील पाण्यात बुडून चार चिमुरड्यांचा मृत्यू

खड्ड्यातील पाण्यात बुडून चार चिमुरड्यांचा मृत्यू

Subscribe

पाण्याच्या खड्ड्यात बुडून चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या मणिपुरी जिल्ह्यातील बिनपूर गावाजवळ असलेल्या खड्ड्यात पाण्यात बुडून चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी ही दुर्दैवी घटना घडली असून सायंकाळपर्यंत तीन चिमुरड्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, एका मुलास गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून त्यानंतर चिमुरड्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या चिमुरड्याला देखील मृत घोषित करण्यात आले. चिमुरड्यांचे मृतदेह मिळताच गावात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

बिनपूर येथील रहिवासी गजराज कठेरिया यांचा दहा वर्षांचा मुलगा सनी कुमार, वीरेंद्र जाटव यांचा नऊ वर्षांचा मुलगा सूरज कुमार, अनुज (९) मुकेश (९) ही सर्व मुलं रविवारी संध्याकाळी शेतात शेळी चरण्यासाठी गेले होती. खूप वेळ झाला तरी मुले घरी का परतली नाही, म्हणून गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पाण्यानी भरलेल्या खड्ड्याच्या बाजूला लहान मुलांचे कपडे आढळून आले. या प्रकरणाची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी मुलांचा शोध घेतला असता त्यांना त्या खड्ड्यामध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळून आला.तर जखमी अवस्थेत होता. मात्र, त्यालाही डॉक्टरांनी मृत्य घोषित केले. एकाच गावातील चार चिमुरड्यांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केरळमधील १०० सदस्यांचे वैद्यकीय पथक महाराष्ट्रात दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -