घरताज्या घडामोडीगिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आणि दळवी रुग्णालयाचे सेक्रेटरी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाशी लढा देण्याकरता डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून यामध्ये डॉक्टरांचा देखील मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आणि दळवी रुग्णालयाचे सेक्रेटरी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे वय ५६ वर्षे होते.

गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर यांची काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने गिरगाव परिसरातील नागरिकांना धक्काच बसला आहे. शांत, संयमी आणि कार्यतत्पर आणि मदतीसाठी कधीही धावून येणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाल्याने अनेक जण हळहळले आहेत.

- Advertisement -

बॉलिवूडचं कपूर कुटुंब शोकात

हे डॉक्टर अनेक बड्या सेलिब्रिटींचेही डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. होमिओपॅथिमध्ये शिरस्ता असलेले डॉक्टर बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते. तसेच अनेक दिग्गज यांच्याकडून उपचार करुन घेत. दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून ते श्वास आणि हायपरटेंशनने ग्रासले होते. यकृत आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून ते श्वास आणि हायपरटेंशनने ग्रासले होते. यकृत आणि हृदयाशी संबंधित आजार देखील होते.

ताप आणि श्वास घेण्यास त्यांना त्रास होऊ लागल्याने १८ मे रोजी बॉम्बे रुग्णालयात आम्ही त्यांना दाखल केले होते. त्यांना २४ मे रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ‘एका क्षणी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जाणवले. आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करु, असे वाटत होते. मात्र, अचानक ते आम्हाला सोडून गेले’.  – पार्थ; डॉक्टरांचा मुलगा

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात मिशन बिगीन अगेन तीन टप्प्यात निर्बंध हटवणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -