घरक्रीडास्टीव्ह स्मिथ आयपीएल खेळण्यासाठी भारतात येण्यास तयार पण...

स्टीव्ह स्मिथ आयपीएल खेळण्यासाठी भारतात येण्यास तयार पण…

Subscribe

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका कायम असूनही, जगभरातील लॉकडाऊन हळूहळू उघडत आहे. कित्येक देशांमध्ये खेळांना सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत आयपीएल सारखी मोठी टी-२० लीग पुन्हा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये खेळण्यास सहमती दर्शविली आहे, पण यासाठी त्याने एक अट ठेवली आहे.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवर कोरोनाचं सावट आहे. स्मिथने सोमवारी सांगितलं की, “परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. आम्हाला जे सांगितले जात आहे ते आम्ही करीत आहोत.” राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, “देशासाठी विश्वचषक खेळण्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती नाही. निश्चितच मी वर्ल्ड कपला प्राधान्य देईन, परंतु जर वर्ल्ड कप पुढे ढकलला गेला आणि आयपीएल घेण्यात आली तर ऑस्ट्रेलियन सरकारच्या परवानगीने मी या टी-२० लीगमध्ये खेळू इच्छित आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – फोनमधून चिनी अ‍ॅप्स काढणारे अॅप भारतात लोकप्रिय, १० लाख डाऊनलोड


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसीला २०२१ पर्यंत टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यास सांगितले आहे, अशा चर्चा आहे. यासंदर्भात १० जून रोजी आयसीसीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. आयपीएलमध्ये आतापर्यंत ८१ सामने खेळलेला स्मिथ म्हणाला, “मी याबद्दल विचार केलेला नाही. आम्ही व्यावसायिक आणि सरकारच्या सल्ल्याचे पालन करू.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -